Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए ) हे दावे निराधार आणि बनावट असल्याचे सांगत स्पष्ट केले की त्यामध्ये कोणतीही तथ्यात्मकता नाही.


परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (४ मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर म्हटले की, “अशा निराधार आणि मनगढंत टिप्पणींपासून दूर राहण्याचा आम्ही सल्ला देतो.” मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत कोणत्याही देशाला इराणविरुद्ध लष्करी हल्ल्यांसाठी आपल्या बंदरांचा वापर करण्याची परवानगी देत नाही.



संयम बाळगा; तणाव आणखी वाढू देऊ नका :


यासोबतच भारताने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव आणखी वाढू न देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.



अमेरिकेचा दावा भारताने खोडला :


भारताची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी सैन्य अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर आली. त्यांनी एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, इराणसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अनेक नौदल तळ नष्ट झाले असून आता त्यांना भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे. मॅकग्रेगर यांनी असे म्हटले होते, “आमचे सर्व बेस नष्ट झाले आहेत, आमची बंदर व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली आहे. आता आम्हाला भारत आणि भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आदर्श परिस्थिती नाही.”



अनेकांचा मृत्यू :


दरम्यान,आज गुरुवारी हे युद्ध सहाव्या दिवशी पोहोचले असून सध्या तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार आतापर्यंत इराणमध्ये आतापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये सुमारे डझनभर लोक ठार झाल्याची माहिती आहे.


या युद्धाची सुरुवात शनिवारी (२८ फेब्रुवारी) झाली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये ८६ वर्षीय इराणी सर्वोच्च नेता आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रदेशातील तणाव झपाट्याने वाढला आहे. जवाबी कारवाई म्हणून इराणने इस्रायल आणि खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा