Maha Budget 2026 : ग्रामीण महाराष्ट्राला विकासाची नवी गती; पायाभूत सुविधांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेल्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी विकासासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला आता थेट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून गावागावांत विकासाला नवी चालना मिळणार आहे.



महाराष्ट्राची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद :


याशिवाय जलमार्ग आणि सौरऊर्जा क्षेत्रातही सरकारने मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. मुंबईतील जलमार्गांचे जाळे ३४० किलोमीटरपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे ७ कोटी प्रवासी या सेवांचा लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी यावर्षी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.



२० लाख झोपड्यांच्या पुनर्विकास होणार :


शहरी विकासासाठीही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईत १० लाख परवडणारी घरे बांधण्याचा आणि २० लाख झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मोठा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे.



जलमाहिती केंद्र उभारण्याची घोषणा :


याशिवाय नाशिकमध्ये राज्य जलमाहिती केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली असून पर्यटनवाढीसाठी दुबई आणि सिंगापूरमध्ये विशेष गुंतवणूक केली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी ४४ हजार कोटी रुपयांहून अधिकची तरतूद करण्यात आली आहे.


तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. दिवंगत अजित पवार यांच्या स्मारक उभारणीचाही प्रस्ताव मांडण्यात आल्याने अर्थसंकल्पातील हा मुद्दा विशेष चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Nashik : ...अन् बिबट्या थेट घरात शिरला, कुटुंबियांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने