२०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता आणि समरसता वर्ष'

मुख्यमंत्र्यांची घोषणा; सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद


मुंबई : राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच थोर समाजसुधारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या जतनापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंती वर्षानिमित्त विविध विकास आराखड्यांसाठी निधीची मोहोर उमटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकन मिळालेल्या १२ किल्ल्यांच्या जतनासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मुनावळे ते वासोटा किल्ला दरम्यान रोपवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आंबेगावची शिवसृष्टी आणि सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ला परिसराचा विकास केला जाईल. आग्रा येथील शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत (हरियाणा) येथील 'काला अंब' मराठा शौर्य स्मारकासाठी राज्य सरकार सहाय्य करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत, तर वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी निधी देण्यात आला आहे.

समतेचा जागर


११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले यांची २०० वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी (कटगुण, सातारा) भव्य स्मारक उभारले जाईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार केला जाईल.


संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त गाडगेबाबांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि श्रद्धास्थान यांना जोडून 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित केले जाणार आहे. तसेच ७५ गावांत 'एआय'च्या सहाय्याने जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येतील.

भक्ती आणि शक्तीचा संगम


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. रामटेक विकास आराखड्याचा दुसरा टप्पा आणि जगदगुरु तुकाराम महाराजांच्या देहू येथील जन्मस्थानाच्या जतनासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित केली जाईल, जिथे महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होईल.

मराठी भाषेसाठी 'अनुवाद अकादमी'


मराठी साहित्याचा प्रसार जागतिक स्तरावर करण्यासाठी आणि इतर भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५० पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल.

Comments
Add Comment

Asian Games 2026: एशियन गेम्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय? कोण ठरणार विजेता?

एशियन गेम्स 2026 स्पर्धेतील पुरूष क्रिकेट स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय येत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे

Asian Games 2026 : अवघ्या २ सेमीने सुवर्ण हुकलं! लांब उडीत एन्सी सोजनची सुवर्णमयी झेप; भारताला मिळवून दिलं रौप्यपदक!

नागोया : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मधील महिलांच्या लांब उडी (Long Jump) स्पर्धेत अत्यंत थरारक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला

IIT Bombay student suicide : IIT बॉम्बेमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण; मैत्रिणीला केलेल्या अखेरच्या फोनमध्ये समोर आले धक्कादायक कारण!

मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात क्राइम ब्रांचच्या

Pinky Balhara Kurash : पिंकी बलहाराचा ऐतिहासिक पराक्रम! ३,५०० वर्षे जुन्या 'कुराश' खेळात दुसऱ्यांदा पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

नवी दिल्ली : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या पिंकी बलहाराने एका अत्यंत प्राचीन खेळात पदक जिंकून इतिहास

Asian Games 2026 : "इथे गटाराचा दुर्गंध येतोय...": जपानमधील आशियाई खेळांच्या ढिसाळ व्यवस्थापनावर मनू भाकरच्या वडिलांचा संताप!

नागोया : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या भारताची स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhakar) हिचे वडील रामकिशन भाकर (ramkishan Bhakar)

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिल्यानंतर