Pinky Balhara Kurash : पिंकी बलहाराचा ऐतिहासिक पराक्रम! ३,५०० वर्षे जुन्या 'कुराश' खेळात दुसऱ्यांदा पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

नवी दिल्ली : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या पिंकी बलहाराने एका अत्यंत प्राचीन खेळात पदक जिंकून इतिहास रचला आहे. या खेळाला तब्बल ३,५०० वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या खेळात एकापेक्षा जास्त पदके जिंकण्याचा पराक्रम पिंकीने केला असून असा कारनामा करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. पिंकीने (pincky balhara) महिलांच्या ७८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत भारतासाठी कांस्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली आहे.



कुराश खेळात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय


आशियाई खेळांच्या इतिहासात कुराश या खेळात एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी पिंकी बलहारा ही देशातील पहिलीच खेळाडू बनली आहे. यापूर्वी २०१८ मधील जकार्ता आशियाई स्पर्धेत तिने रौप्य पदक (Silver Medal) जिंकले होते. आता २०२६ च्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावून तिने आपल्या पदकांची संख्या दोनवर नेली आहे. आशियाई खेळांच्या इतिहासातील कुराशमधील हे भारताचे एकूण तिसरे पदक ठरले आहे. पिंकीशिवाय २०१८ मध्ये मालाप्रभा जाधव हिने ५२ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्य पदक जिंकले होते.



असा निश्चित झाला कांस्य पदकाचा मार्ग


पिंकीने उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत आशियाई चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती आणि दक्षिण कोरियाची कसलेली पैलवान लिम गराम हिचा ३-० असा धुव्वा उडवला. या मोठ्या विजयासह तिने ७८ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारताचे पदक पक्के केले. मात्र, उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिला सुवर्ण किंवा रौप्य पदकापर्यंत पोहोचता आले नाही आणि कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.



काय आहे हा ३,५०० वर्षे जुना 'कुराश' खेळ ?


कुराश हा कुस्तीचाच एक अतिशय प्राचीन प्रकार मानला जातो, ज्याचा उगम मध्य आशियातील उझबेकिस्तानमध्ये ३,५०० वर्षांपूर्वी झाला होता. या खेळात मल्ल एका विशेष प्रकारचे जॅकेट घालतात आणि त्याला एकाच रंगाचा बेल्ट बांधून रिंगणात उतरतात. आशियाई खेळांमध्ये या प्राचीन खेळाचा समावेश सर्वात पहिल्यांदा २०१८ मधील जकार्ता आशियाई स्पर्धेत करण्यात आला होता.

Comments
Add Comment

IIT Bombay student suicide : IIT बॉम्बेमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण; मैत्रिणीला केलेल्या अखेरच्या फोनमध्ये समोर आले धक्कादायक कारण!

मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात क्राइम ब्रांचच्या

Asian Games 2026 : "इथे गटाराचा दुर्गंध येतोय...": जपानमधील आशियाई खेळांच्या ढिसाळ व्यवस्थापनावर मनू भाकरच्या वडिलांचा संताप!

नागोया : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या भारताची स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhakar) हिचे वडील रामकिशन भाकर (ramkishan Bhakar)

Asian Games 2026 : आशियाई खेळात भारताचा डंका! ईशा सिंगचं रौप्य, लव्हलिनाचं पदक निश्चित तर भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये!

आशियाई खेळांच्या १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. महिलांच्या २५

Ujjain Shahi Masjid Tension : उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून तणाव; रस्ता रुंदीकरणादरम्यान दगडफेक आणि अश्रूधुराचा वापर

उज्जैन : उज्जैनमधील गोपाळ मंदिर (Ujjain Gopal Mandir) आणि छत्री चौक परिसरात प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी शाही मशिदीचा (Shahi

Indian Railway : भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा! पहिली 'LNG ट्रेन' सेवेत दाखल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पर्यावरणपूरक रेल्वेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील पहिली LNG

१२ फूट लांबीच्या अजगराने गावात उडवली खळबळ ! २० किलोच्या नीलगायच्या पाडसाला गिळले अन्...

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तब्बल १२ फूट लांबीच्या अजगरामुळे एका गावात मोठी खळबळ उडाली. शेतातून