इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी समुद्रात तसेच जमिनीवर ठिकठिकाणी इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय केले आहेत. या जॅमरमुळे इंटरनेट ठप्प होणे, मोबाईलचे नेटवर्क गायब होणे, फोन न लागणे किंवा फोन न येणे या समस्या जाणवू लागल्या आहेत. समुद्रात सक्रीय असलेल्या जॅमरमुळे जहाजांची वाहतूक पुरती कोलमडली आहे.



समुद्रात असताना प्रत्येक जहाज इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम वापरते. अक्षांश - रेखांशांच्या आधारे इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम प्रत्येक जहाजाचे समुद्रातले भौगोलिक स्थान निश्चित करते. यामुळे जहाज हाताळणाऱ्यांना आपण नेमके कुठे आहोत आणि कसा प्रवास करत आहोत याची माहिती सतत मिळत असते. हीच माहिती जवळच्या देशांतील जहाजांच्या नियंत्रण कक्षांनाही मिळत असते. या माहितीचा वापर करून आणि जवळच्या जहाजांच्या तसेच जवळ असलेल्या देशाच्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून प्रत्येक जहाज मार्गक्रमण करत असते.



समुद्रात जॅमर सक्रीय असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम विस्कळीत झाली आहे. यामुळे हजारो जहाजांना त्यांचे भौगोलिक स्थान समजणे अशक्य झाले आहे. शिवाय जवळच्या जहाजांशी आणि जवळच्या देशाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. या समस्यांमुळे जहाजांची वाहतूक पुरती विस्कळीत झाली आहे. अनेक जहाजांनी यंत्रणा सुरळीत होईपर्यंत आहोत तिथेच थांबणे अथवा साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या एखाद्या जवळच्या जहाजाच्या आसपास राहून मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे. तर काही जहाजांनी अनुभवांच्या आधारे अंदाजे मार्गक्रमण सुरू केले आहे. यामुळे सागरी मार्गांवरील जहाजांच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कोणते जहाज कधी कोणता किनारा गाठणार याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. याचा जहाज वाहतुकीशी संलग्न सर्व व्यवसायांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.



होर्मुझच्या सामुद्रधुनीतून २६ - २७ फेब्रुवारी दरम्यान १०० पेक्षा जास्त जहाजांनी प्रवास केला होता. पण ४ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून फक्त पाच जहाजांनी प्रवास केला. आता तर होर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकी किती जहाजं आहेत आणि ती कुठे आहेत याचे तपशील समजणे अशक्य झाले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध लवकर थांबले नाही तर समुद्रात काही जहाजांचा अपघात होण्याचा तसेच काही जहाज भरकटण्याचा धोका आहे. यामुळे सागरी मार्गाने होणारी सर्व मालवाहतूक आणि तेलवाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.

Comments
Add Comment

Canada Helicopter Crash : कॅनडात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले

कॅनडा : कॅनडातील (Canada) मॉन्ट्रियलच्या दक्षिणेकडील भागात शनिवारी, 26 सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

India Pakistan UN : 'रात्री दहशतवाद, दिवसा सुरक्षेचा उपदेश करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,' UN मध्ये भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी

Plane Crash : विमानाचा भीषण अपघात ! दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

Plane Crash : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये विमानाचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन वरिष्ठ

Iran US Conflict : ट्रम्प यांनी इराणच्या 'मास्टरस्ट्रोक' प्रस्तावाला दाखवला अंगठा; होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची ऑफर फेटाळली!

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा सात दिवसांचा शस्त्रसंधीचा आणि महत्त्वाची ऊर्जा वाहिनी पुन्हा सुरू

Pak Afghan border : पाकिस्तान-अफगाण सीमेवर घमासान! तालिबानचे अनेक लढवय्ये ठार; सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील वाढता तणाव आता एका हिंसक संघर्षात रूपांतरित झाला आहे.

ब्रह्मांडाच्या एका अथांग कोपऱ्यातून पृथ्वीवर आला रेडिओ सिग्नल; शास्त्रज्ञही चक्रावले, त्या ग्रहावर आहे तरी काय?

पृथ्वीपलीकडील जगाबाबत मानवी संस्कृतीत कायमच आकर्षण राहिलं आहे. या पृथ्वीबाहेरही जग आहे का? असं कायम मनात वाटत