India Pakistan UN : 'रात्री दहशतवाद, दिवसा सुरक्षेचा उपदेश करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,' UN मध्ये भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी केलेल्या वक्तव्यांना भारताने अत्यंत आक्रमक आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडत दहशतवाद, मानवाधिकार आणि PoK च्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले. भारताने ठणकावून सांगितले की, जो देश स्वतः दहशतवादाचा उगमस्थान आहे, त्याने जागतिक मंचावर शांततेचा उपदेश करणे पूर्णपणे हास्यास्पद आहे.



ओसामा बिन लादेन आणि दहशतवादावरून पाकिस्तान उघडा पडला


पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या दुटप्पीपणावर ताशेरे ओढताना म्हटले की, पाकिस्तान रात्री दहशतवादाला प्रोत्साहन देतो आणि दिवसा सुरक्षेच्या गोष्टी करतो. ज्या वेळी न्यूयॉर्क शहर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची २५ वी वर्षपूर्ती पाळत आहे, त्याच कालावधीत हे लक्षात घेतले पाहिजे की या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन एका पाकिस्तानी लष्करी अकादमीजवळ आश्रयाला होता. दहशतवादाचा इतिहास असलेल्या देशाला भारताला किंवा जगाला शांततेचा धडा शिकवण्याचा कोणताही अधिकार नाही, असे भारताने स्पष्ट केले.(Petal Gahlot UN Speech)



काश्मीरवर भारताचे स्पष्टीकरण आणि PoK मधील अत्याचारांवर बोट


काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला फटकारताना भारताने ठणकावले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि कायम राहतील. पाकिस्तानने मानवाधिकारांवर बढाया मारण्याऐवजी स्वतः बेकायदेशीरपणे बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) परिस्थितीकडे पाहावे. रावलकोटसह आजूबाजूच्या परिसरात पाकिस्तानी लष्कराकडून नागरिकांवर होणारे अमानुष अत्याचार, मनमानी हत्या आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन जगभर  लपलेले नाही, असे भारताने सुनावले.(India Pakistan UN)



ईशनिंदा कायदे आणि लष्करी राजवटीवर जोरदार प्रहार


पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवस्थेवर टीका करताना पेटल गहलोत म्हणाल्या की, ज्या देशाची संपूर्ण कायदेशीर व राजकीय व्यवस्था ईशनिंदा कायदे आणि धार्मिक कट्टरतेवर चालते, त्यांनी धार्मिक सहिष्णुतेवर बोलणे म्हणजे ढोंगीपणा आहे. पाकिस्तानातील हिंदू, शीख आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याकांना ज्या अमानुष वागणूक दिली जाते, ती संपूर्ण जगाला ठाऊक आहे. तसेच, तिथले सरकार केवळ लष्कराद्वारे आणि लष्करासाठी चालवले जाते, कठपुतळीनेते बदलत असले तरी खरे निर्णय कोण घेते हे जगाला माहीत आहे.(Petal Gahlot UN Speech)



भारताचे 'शून्य सहनशीलता' धोरण


आपल्या भाषेचा शेवट करताना पेटल गहलोत यांनी स्पष्ट केले की, भारत कोणतीही अणुबॉम्बची धमकी किंवा दहशतवादाचे प्रेशर सहन करणार नाही. भारताचे दहशतवादाविरोधात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही कुरापतीचे गंभीर परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागतील, असा कडक इशारा भारताने दिला आहे.(India Pakistan UN)

Comments
Add Comment

Plane Crash : विमानाचा भीषण अपघात ! दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

Plane Crash : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये विमानाचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन वरिष्ठ

Iran US Conflict : ट्रम्प यांनी इराणच्या 'मास्टरस्ट्रोक' प्रस्तावाला दाखवला अंगठा; होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची ऑफर फेटाळली!

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा सात दिवसांचा शस्त्रसंधीचा आणि महत्त्वाची ऊर्जा वाहिनी पुन्हा सुरू

Pak Afghan border : पाकिस्तान-अफगाण सीमेवर घमासान! तालिबानचे अनेक लढवय्ये ठार; सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील वाढता तणाव आता एका हिंसक संघर्षात रूपांतरित झाला आहे.

ब्रह्मांडाच्या एका अथांग कोपऱ्यातून पृथ्वीवर आला रेडिओ सिग्नल; शास्त्रज्ञही चक्रावले, त्या ग्रहावर आहे तरी काय?

पृथ्वीपलीकडील जगाबाबत मानवी संस्कृतीत कायमच आकर्षण राहिलं आहे. या पृथ्वीबाहेरही जग आहे का? असं कायम मनात वाटत

US Iran War : अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती वाढणार? हिंद महासागरापर्यंत युद्ध पसरवण्याचा इराणचा थेट इशारा

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक वळण

G20 Summit 2026 : अमेरिकेची मोठी खेळी! 2026 च्या जी-20 शिखर परिषदेसाठी व्लादिमीर पुतिन यांना थेट अमेरिकेचे निमंत्रण

वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेने रशियाचे