नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर महा ई-सेवा आणि आधार सेवा केंद्र चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सेवांना अधिक गती देण्यासाठी पुढील एका महिन्यात एक 'आदर्श कार्यपद्धती' (SOP) आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. त्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, संचालक भुवनेश्वरी एस. आणि अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


बैठकीत केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री शेलार म्हणाले की, "नागरिकांच्या ई-सेवा आणि आधार केंद्रांवरील गरजा वाढल्या आहेत. या सेवा वेळेत मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हे केंद्र चालवणारा व्यावसायिक टिकणेही गरजेचे आहे." आधार सेवा केंद्र चालकांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कमिशन लवकरात लवकर अदा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मंत्र्यांनी दिले. महा ई-सेवा केंद्र सुरू करताना महाऑनलाईन, महाआयटी आणि सीएमएसकडे जमा केलेली अनामत रक्कम (Security Deposit) चालकांना परत मिळवून देण्यासाठी तिन्ही संस्थांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्र चालवताना प्रत्यक्षात किती खर्च येतो आणि चालकांना किती उत्पन्न मिळते, याचा ताळमेळ बसवण्यासाठी एक विशेष अभ्यासगट (Study Group) स्थापन करण्याची सूचना मंत्र्यांनी केली.


महिन्याभरात नवीन धोरण


येत्या ३० दिवसांत माहिती तंत्रज्ञान विभाग एक नवीन धोरण आराखडा तयार करेल. यामुळे राज्यातील हजारो केंद्र चालकांना दिलासा मिळणार असून, नागरिकांना दाखले, आधार अपडेट आणि इतर डिजिटल सेवा मिळणे अधिक सोपे होणार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि पारदर्शकता वाढवणे हा देखील या धोरणाचा मुख्य उद्देश असणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनांचा अपघात झाला. दोन आयशर टेम्पो आणि

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईकरांनी साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप, विसर्जनाच्या दिवशी 35,000 हून अधिक मूर्तीचे विसर्जन

मुंबई: साश्रूनयनांनी काल लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला. मुंबईमध्ये अनेक मानाच्या गणपतींसह इतरत्र

महाराष्ट्रात ‘SIR’ बाबत दावे- हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत महाराष्ट्रातील मतदारांना दावे आणि हरकती दाखल

Mumbai Port : मुंबई बंदरावर ‘बार्ज रोल-ऑफ’चा यशस्वी प्रयोग; 1,452 मेट्रिक टन अवजड मालाची सुरक्षित हाताळणी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने अत्यंत अवजड आणि मोठ्या आकाराच्या औद्योगिक उपकरणांची यशस्वी हाताळणी करत नवी

Central Railway : सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज; 418 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य