'जळगाव भूसंपादन गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करणार'

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन संपादनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, या प्रकरणाची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील 'विशेष तपास पथकामार्फत' ( एसआयटी ) सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या समितीमध्ये दोन आयएएस आणि एक आयपीएस दर्जाचा अधिकारी असेल, जेणेकरून या प्रकरणातील फौजदारी बाबींचीही तपासणी होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणातील आणि विविध विभागांच्या संशयास्पद भूमिकेवर लक्षवेधी सूचना मांडली होती.


सहा विभागांची होणार चौकशी


या प्रकरणाचे स्वरूप व्यापक असून यामध्ये केवळ महसूल विभागच नाही, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुद्रांक शुल्क विभाग, भूसंपादन कार्यालय, भूमी अभिलेख आणि स्थानिक तलाठी अशा एकूण सहा विभागांचा सहभाग असल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. "नोंदी घेण्यापासून ते निवाडे तयार करण्यापर्यंत कुठे गडबड झाली आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ एक नाही, तर नऊ गावांमधील निवाड्यांची तपासणी ही समिती करेल," असे बावनकुळे यांनी सांगितले.


आर्थिक फसवणूक टळली असली तरी 'हेतू'ची चौकशी


महसूलमंत्री म्हणाले की, "सुदैवाने, भूसंपादनाचा मोबदला अद्याप वाटप करण्यात आलेला नाही, तो आपण वेळेत थांबवला आहे. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झालेली नाही. मात्र, शासनाची फसवणूक करण्याचा 'प्रयत्न' झाला का? काही विशिष्ट लोकांसाठी प्रकल्पाचे नकाशे बदलण्यात आले का? या सर्व बाबी एसआयटी तपासेल. ३ महिन्यांच्या आत हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल."


चर्चा सुरू असताना आमदार मंगेश चव्हाण आणि इतर सदस्यांनी या प्रकरणात 'नेक्सस' (संगनमत) असल्याचे आरोप केले. "ज्या जमिनींवर केंद्राचे किंवा राष्ट्रपतींचे नाव लागले आहे, त्या जमिनींवर फळबाग लावून मोबदला लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. हे एक मोठे सिंडिकेट असून दोषी अधिकाऱ्यांवर केवळ चौकशी नाही, तर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन झाले पाहिजे," अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

BJP-MNS Clash : माहिममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद

दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही