'आखाती देशांतील अमेरिकेशी संबंधित बँकांवर हल्ले करणार'

तेहरान : पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता तेराव्या दिवसांत प्रवेश केला आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकेशी संबंधित बँकांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आखाती देशांतील पाश्चात्य बँकांमध्ये दहशत पसरली आहे.


अमेरिकेने इराणमध्ये देशातील सर्वात जुन्या बँकेच्या शाखेवर हवाई हल्ला केला. हा हल्ला झाला त्यावेळी बँकेत कामकाज सुरू होते यामुळे मोठी जीवितहानी झाली. या घटनेचा बदला म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकेशी संबंधित बँकांवर हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.


इराणने इशारा दिल्यानंतर अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना या प्रदेशातील कार्यालयांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार , सिटीबँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दुबईच्या इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरमधील त्यांचे दीर्घकाळापासूनचे प्रादेशिक मुख्यालय तात्काळ रिकामे करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या एका नोटीसमध्ये "वाढत्या सुरक्षा चिंतांमुळे" सर्वांना "कार्यालयापासून दूर सर्वात जवळचे सुरक्षित ठिकाण" शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मागच्या आठवड्यात घरून काम करण्याची सूचना दिल्यानंतर आता स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने अनेक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत बँकेच्या कार्यालयात येण्यास मज्जाव केला आहे. एचएसबीसीने त्यांच्या कतारमधील सर्व शाखा बंद केल्या आहेत.


युनायटेड स्टेट्स आणि या प्रदेशातील झिओनिस्ट राजवटीच्या आर्थिक केंद्रे आणि बँकांना लक्ष्य करणार, असा इशारा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (Islamic Revolutionary Guard Corps or IRGC) दिला आहे. या प्रदेशातील लोकांनी बँकांच्या एक किलोमीटरच्या परिघात राहू नये. अमेरिकन लोकांनी दूरच राहावे नाहीतर परिणाम भोगावे, असाही इशारा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिला आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे