भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा अभूतपूर्व कायापालट करण्याचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.


राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमि अभिलेख विभागासाठी नवीन सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात आला आहे. भूमि अभिलेख विभागात यापूर्वी ९,६८९ पदे मंजूर होती. आता यामध्ये ९९४ नवीन पदांची वाढ करण्यात आली असून, विभागाचा एकूण आकृतीबंध आता १०,६८३ पदांचा झाला आहे. यामध्ये नियमित पदांसोबतच काही सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील कामाची वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन अतिरिक्त पदांच्या निर्मितीसाठी विशेष लक्ष दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, उच्चस्तरीय सचिव समितीच्या मंजुरीनंतर आता या सुधारित आकृतीबंधावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याशिवाय सहाय्यक संचालक, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तांत्रिक पदांचाही यात समावेश आहे.


पुढील महत्त्वाची पदे मंजूर : 


* अपर जिल्हाधिकारी : २ पदे
* उपसंचालक भूमि अभिलेख : ९ पदे
* जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख : ४६ पदे
* उप अधीक्षक भूमि अभिलेख : ५१५ पदे
* परिरक्षण भूमापक : २,५६८ पदे
* भूकरमापक : ४,३६९ पदे
* शिरस्तेदार : १,००७ पदे


राज्यात नवीन कार्यालयांचे जाळे : प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी अनेक नवीन कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत.
* उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय : १ नवीन कार्यालय (नांदेड)
* जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालये : ८ नवीन कार्यालये (नागपूर, अमरावती, छ. संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि मुंबई उपनगर)
* नगर भूमापन अधिकारी कार्यालये : २३ नवीन कार्यालये (पुणे, कोकण, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागांत)
* याव्यतिरिक्त ५ नवीन विशेष उप अधीक्षक कार्यालये आणि १२ नवीन चौकशी अधिकारी कार्यालये निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
विभागाच्या या सक्षमीकरणामुळे जमिनींचे मोजमाप, अभिलेख अद्ययावत करणे आणि जनतेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले