मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.


राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थानी उपस्थित होते.


हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीची गरज
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे पारंपरिक पद्धतीची शेती अधिक जोखमीची बनत आहे. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणात टिकून राहणारी आणि स्थिर उत्पादन देणारी नवीन पीकवाणे विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो; मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त व्हावेत यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.


या संदर्भात कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेती मॉडेल विकसित करण्याची जबाबदारी कृषी संशोधन संस्थांवर असल्याचेही त्यांनी सांगितले.


यापूर्वीच्या काळात सरकारचा दृष्टिकोन कृषी क्षेत्राकडे प्रामुख्याने ‘रिलीफ’ आणि ‘रिहॅबिलिटेशन’पुरता मर्यादित होता. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मदत देणे एवढीच भूमिका घेतली जात होती, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


मात्र सध्याच्या सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन, तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून शेती अधिक टिकाऊ आणि नफ्याची बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा