२१ वर्षीय जैन भिक्षूचा मृत्यू; १५ व्या वर्षी दीक्षा, सहा वर्षात मृत्यू

पालघर: सहकाऱ्यांसोबत पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या २१ वर्षीय जैन भिक्षू यांच्या मृत्यूने जैन समाजात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नम्ररत्न महाराज आणि त्यांचे सहकारी सफाळ्यातील प्रतापधाम सतीवलीहून विरारहून पुढे असलेल्या महावीरधाम शिरसाद तीर्थक्षेत्राच्या दिशेने पुढे निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत अघटित घडलं अन् यात त्यांचा मृत्यू झाला.



नेमकं काय घडलं?



जैन भिक्षू नम्ररत्न विजय मूळ गुजरातचे निवासी होते. पहाटे ५.१५ च्या दरम्यान ते विरारजवळील भालीवली पुलाजवळ होते. त्याचवेळी राजमार्गाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरातहून वेगाने येणाऱ्या चारचाकी गाडीला एका ट्रकने धडक दिली होती. यानंतर चारचाकीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जैन भिक्षूला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर जखमी झालेल्या भिक्षूंना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.



ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्र्क आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुखद घटनेनंतर जैन समुदायात शोक व्यक्त केला जात आहे. मुनिराज नम्ररत्न यांनी २०२० मध्ये धर्मसूरी संप्रदायातून दीक्षा घेतली होती. त्यावेळी ते १५ वर्षांचे होते. त्यांनी दीक्षा घेऊन त्यांना सहा वर्ष एक दिवस पूर्ण झाला. इतक्या कमी वयात ते दीक्षा घेऊन महाराज झाले आणि सहा वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने समाजातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा