सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चिपी विमानतळासाठी १०० टक्के 'व्हिजीएफ' (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी देण्यात आल्यामुळे, आता मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
प्रादेशिक विमान वाहतूक सेवा अधिक सक्षम आणि परवडणारी व्हावी, यासाठी सरकारकडून 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' दिले जाते. चिपी विमानतळाच्या बाबतीत ही सुविधा १०० टक्के मंजूर झाल्याने, विमान कंपन्यांना कोणताही आर्थिक अडथळा न येता नियमित सेवा देणे शक्य होणार आहे.



फायदा काय होणार?


चिपी विमानतळावरून दररोज सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्गमधील अंतर केवळ तासाभराचे राहणार आहे. याचा सर्वाधिक फायदा पर्यटनाला होणार असून चाकरमानी आणि व्यावसायिकांचीही मोठी सोय होणार आहे. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या मार्गांसाठीही अशाच प्रकारचा 'व्हिजीएफ' निधी मंजूर करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि