अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन


मुंबई : "माणसाला मानवतेची जाणीव करून देणारा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. ज्या विषमतेने आणि अनिष्ठ प्रथांनी विखंडित समाज निर्माण केला, त्याच व्यवस्थेमुळे देशाला शेकडो वर्षे गुलामगिरी सोसावी लागली. मुळात अस्पृश्यता आणि विषमता हा सर्वात मोठा अपराध असून, भावी पिढीला समतेचे मूल्य आणि विषमतेमुळे झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी समजणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चवदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, उद्योगमंत्री उदय सामंत, भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.


ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, "३ एप्रिल १९२७ च्या 'बहिष्कृत भारत'मध्ये बाबासाहेबांनी या आंदोलनाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. ज्याप्रमाणे त्या क्रांतीने जगाचा इतिहास बदलला, त्याचप्रमाणे या सत्याग्रहाने भारताचे भविष्य बदलले. आपण वारंवार गुलाम का झालो, याचा विचार केला तर त्या मुळाशी आपल्या समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यतेसारख्या कुप्रथा होत्या. असा विखंडित समाज नेहमीच पराभूत होतो. जर या प्रथा नसत्या, तर भारत कधीच गुलाम झाला नसता."



सर्वांगीण विकासाचा आराखडा :


या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार चवदार तळ्याच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. केवळ जलशुद्धीकरणच नव्हे, तर या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकारने विशेष आराखडा तयार केला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी समतेचा मंत्र दिला, त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे सुशोभीकरण केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी