Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीवरून इराणवर हल्ला करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे भ्रामक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.


परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट-चेक विभागाने सांगितले की, भारत कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा वापर तिसऱ्या देशावर लष्करी कारवाईसाठी करू देत नाही. अशा प्रकारच्या बातम्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसून नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे समोर आला होता. त्या पोस्टमध्ये अमेरिकेने पश्चिम भारतातून इराणवर बॉम्बहल्ला करण्यासाठी लष्करी संसाधनांच्या वापराची परवानगी मागितल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या दाव्याला भारत-अमेरिका दरम्यान झालेल्या एलईएमओए (Logistics Exchange Memorandum of Agreement) कराराशी जोडून दाखवण्यात आले.


तज्ज्ञांच्या मते, एलईएमओए हा २०१६ मध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला एक लॉजिस्टिक सहकार्य करार आहे. या कराराचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर इंधन भरणे, दुरुस्ती, रसद पुरवठा, संयुक्त सराव आणि मानवीय मदत यासाठी करू शकतात.


मात्र, एलईएमओए करार कोणत्याही प्रकारच्या आक्रमक लष्करी कारवाईसाठी किंवा तिसऱ्या देशावर हल्ला करण्यासाठी परवानगी देत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा करार केवळ सहाय्यक स्वरूपाचा असून त्याचा वापर परस्पर संमतीने आणि आवश्यकतेनुसारच केला जातो.


परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा