अमेरिकेचे एफ-15 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने दावा केला आहे की होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान त्यांनी पाडले आहे.इराणच्या सरकारी माध्यमांनी या घटनेचा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे.


इराणी संयुक्त हवाई संरक्षण कमांडच्या माहितीनुसार, त्यांच्या रडार प्रणालीने दक्षिण किनाऱ्याजवळ एका अज्ञात लढाऊ विमानाची ओळख पटवली होती. वारंवार इशारा देऊनही विमानाने दिशा न बदलल्याने इराणी क्षेपणास्त्राने त्यावर लक्ष्य साधून ते पाडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणच्या मते, अमेरिकन विमान त्यांच्या सार्वभौमत्वाचे थेट उल्लंघन करत होते. प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आकाशात मोठा स्फोट होताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीपासूनच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्ष सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांत तणाव इतका वाढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर इशारा दिला होता. होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यास इराणच्या पायाभूत सुविधांवर भीषण हल्ले केले जातील, असे त्यांनी म्हटले होते. इराणची ही ताजी कारवाई त्या इशाऱ्याला दिलेले प्रत्युत्तर मानली जात आहे.


मात्र, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अद्याप त्यांच्या कोणत्याही एफ-१५ विमानाचा पाडाव झाल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. यापूर्वी मार्चच्या सुरुवातीला इराणने एफ-३५ विमान पाडल्याचा दावा केला होता, परंतु अमेरिकेने तो फेटाळून लावला होता.


इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगातील एक मोठा तेलव्यापार याच मार्गातून होतो. हा संघर्ष अधिक काळ चालू राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे