नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे भेट देऊन विविध सुविधा व व्यवस्थांची पाहणी करीत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.


वणी गडावरील श्री सप्तश्रुंगी देवीचा यात्रोत्सव २६ मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक टेंभेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वसावे यांच्यासह वीज वितरण, जिल्हा परिषदेचे अधिकारी, गडाचे विश्वस्त, उपसरपंच संदीप बेनके, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यातच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छ्ता आदींचे नियोजन करावे. भाविकांना टप्प्या - टप्प्याने दर्शनासाठी सोडावे. मंदिर परिसरात आगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच इतर पायाभूत सुविधांची योग्य व नियोजनबद्ध व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.


भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस बंदोबस्त ठेवावा, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच, यात्रेदरम्यान अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पाडाव्यात. त्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे यांची इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.


तहसीलदार वारुळे यांनी यात्रेसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही गड परिसरास भेट देऊन पोलिस बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला.

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी