नोकरदारवर्गाच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार, १ एप्रिलपासून पगारावर काय परिणाम होणार?

मुंबई: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच नोकरदारवर्गाच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. सरकार नवीन इनकम टॅक्स अ‍ॅक्ट २०२५ आणि लेबर कोड लागू करणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर पगार रचना, हातामध्ये येणारा पगार आणि निवृत्ती निधी यावर थेट परिणाम होईल.



काय आहे नवीन लेबर कोड?



नवीन लेबर कोडमधील सर्वात मोठा बदल बेसिक सॅलरीबाबत आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण सीटीसीच्या (CTC) किमान ५० टक्के असणे आवश्यक आहे. सध्या अनेक कंपन्या कर वाचवण्यासाठी मूळ पगार कमी ठेवतात आणि एचआरए (HRA), ट्रॅव्हल अलाउन्स आणि स्पेशल अलाउन्स यासारखे भत्ते ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढवतात. आता नवीन नियमानंतर, सर्व भत्ते एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत.



टेक-होम सॅलरीवर होणारा परिणाम



मूळ पगार वाढल्याचा थेट परिणाम तुमच्या टेक-होम म्हणजेच हातात येणाऱ्या पगारावर होईल. कारण पीएफ आणि ग्रॅच्युटीचा हिशेब मूळ पगाराच्या आधारावर केला जातो, त्यामुळे मूळ पगार वाढल्यास तुमचे पीएफ योगदानही वाढेल. पीएफ जास्त कापला गेल्यामुळे महिन्याच्या शेवटी हातामध्ये कमी पगार येऊ होऊ शकते. पण याची जमेची बाजू म्हणजे तुमचा निवृत्तीनंतरचा निधी पूर्वीच्या तुलनेत बराच जास्त असेल.



इनकम टॅक्सचे गणित



पगार रचनेत बदल झाल्यामुळे टॅक्सवरही परिणाम दिसून येईल. ज्या कर्मचाऱ्यांनी जुन्या कर प्रणालीचा (Old Tax Regime) पर्याय निवडला आहे, त्यांच्यासाठी मूळ पगार वाढल्यामुळे एचआरएवर मिळणारी कर सवलत कमी होऊ शकते. कारण एचआरए सवलतीचा एक हिस्सा मूळ पगाराच्या १० टक्के आधारावर ठरवला जातो. दुसरीकडे नवीन कर प्रणाली (New Tax Regime) निवडणाऱ्यांसाठी अडचण कमी आहे. कारण नवीन प्रणालीमध्ये वार्षिक १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.



कंपन्या आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी



कंपन्यांना आता आपली पेरोल सिस्टीम (Payroll System) नव्याने तयार करावी लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार सध्या एकूण पगाराच्या २० ते ३० टक्के असेल, तर कंपनीला तो वाढवून ५० टक्के करणे अनिवार्य असेल. यामुळे कंपनीवर ग्रॅच्युटी आणि पीएफ योगदानाचा आर्थिक बोजा देखील वाढणार आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली