चोरट्यांनी बँक लुटली, रोख १३.७ लाख रुपये आणि २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी १३.७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले. बँकेच्या सिक्युरिटी लॉकरमधून चोरट्यांनी दागिने चोरले. डॉन या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने या संदर्भातले वृत्त दिले आहे.


रात्रीच्या वेळी संरक्षणासाठी कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या शाखेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक झालेली नाही. यामुळे रात्री पकडले जाण्याचा धोका कमी आहे हे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी परिसर निर्मनुष्य होण्याची वाट बघितली आणि संधी साधली. बँकेचे धातूचे शटर आणि कुंपण तसेच सिक्युरिटी लॉकर तोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटर, हातोडा, पक्कड या साधनांचा वापर केला. चोरट्यांनी लॉकर तोडून ४०० तोळं सोनं चोरलं. या सोन्याची किंमत २.१० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


संशयितांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी बँकेच्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील आणि शहरातील 'सेफ सिटी प्रोजेक्ट'मधील फुटेज तापसण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.


बँकेवरचा दरोडा हा पेशावरमधील १५ दिवसांपेक्षा कमी काळातील दुसरा मोठा बँक दरोडा आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी, पोलिसांनी पीरबला भागातील एका खासगी बँकेतील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन अधिकारी जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे