Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलांसोबत इतर संबंधित महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निरपराध महिलांचीही बदनामी होत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घेतले आहे.


या प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर मॉर्फ करून तसेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट स्वरूपात व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांनी अशा सर्व आक्षेपार्ह पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवले असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवला


दरम्यान, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवरही लक्ष ठेवण्यात येत आहे, जेणेकरून प्रकरणाची संवेदनशीलता कायम राहील. एकूणच, अशोक खरात प्रकरणात आता तपासाबरोबरच सोशल मीडिया मॉनिटरिंगलाही प्राधान्य देण्यात येत असून, पीडित महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत.



Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील