कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत. आयपीएलसाठी कर्नाटक सरकारने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कर्नाटकच्या प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे प्रत्येकी दोन VIP पास मिळणार आहेत. सर्व VIP पासधारकांची एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.


विधानसभेत VIP पाससाठी अनेक आमदारांनी आग्रही मागणी केली. विधानसभाध्यक्षांनी समजूत काढूनही आमदार शांत होत नसल्याचे बघून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्व व्हीआयपींसाठी एका स्टँडची व्यवस्था केली. यानंतर प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे प्रत्येकी दोन VIP पास मिळतील, अशी घोषणा कर्नाटक सरकारने केली.


कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या VIP पासची सोय केली. नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यानंतर कर्नाटक सरकारने आमदारांच्या VIP पासबाबत अधिकृत घोषणा केली. उर्वरित सामन्यांबाबत नंतर चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३०० आमदार पाससाठी आग्रही होते. या सर्व आमदारांना प्रत्येकी दोन प्रमाणे ६०० पास मिळणार आहेत. या ६०० व्हीआयपींसाठी विशेष स्टँडची व्यवस्था करण्यात आली आहे.


आमदारांनी व्हीआयपी पासची मागणी केली आणि रांगेत उभे राहून तिकिटांची खरेदी करणार नाही, असे ठामपणे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून मान राखला गेला पाहिजे अशी आमदारांची भूमिका होती. अखेर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्याशी चर्चा करून आमदारांच्या पासची सोय केली.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि