भारतीय सैनिकांना मिळाल्या शत्रूला दणका देणार प्रहार लाईट मशिन गन

ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन जवानांना मिळाल्या आहेत. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने या शस्त्राची निर्मिती केली आहे. लवकरच आणखी प्रहार लाईट मशिन गन भारताच्या जवानांना मिळणार आहेत.


अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने एका विशेष सोहळ्यात प्रहार लाईट मशिन गनची पहिली बॅच भारतीय लष्कराला सुपूर्द केली. याप्रसंगी संरक्षण मंत्रालयाचे खरेदी विभागाचे महासंचालक ए. अंबरासू, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष राजवंशी तसेच अदानी डिफेन्सचे इतर अधिकारी उपस्थित होते. अंबरासू यांनी लष्करासाठीच्या एलएमजी अर्थात प्रहार लाईट मशिन गनने भरलेल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ट्रक लष्कराच्या छावणीच्या दिशेने रवाना झाला.


अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने विहित कालावधीच्या ११ महिने आधीच तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन पुरवठा केला आहे. प्रयोग करून अंतिम निर्मित करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण कंपनीने सहा वर्ष आणि एक महिना या कालावधीत गनचा पुरवठा केला. नियोजनानुसार पुढील तीन वर्षांत लष्कराच्या मागणीनुसार पूर्ण पुरवठा केला जाणार असल्याची ग्वाही अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने दिला आहे. कंपनीकडे ४० हजार एलएमजीची ऑर्डर आली आहे. यापैकी दोन हजार गन लष्कराला मिळाल्या असून उर्वरित गनचा पुरवठा अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी पुढील तीन वर्षांत करणार आहे.


प्रहार एलएमजीची प्रमुख वैशिष्ट्ये:




  1. पायदळ सैनिकांची लढण्याची क्षमता वाढवते

  2. ७.६२ मिमी कॅलिबरची प्रहार एलएमजी सैनिकांना वेगाने गोळीबार करण्याची आणि शत्रूवर दबाव निर्माण करण्याची संधी मिळवून देते.

  3. प्रहार एलएमजी ओपन-बोल्ट, गॅसवर चालणारी एलएमजी आहे, जिचे वजन ७.६ किलो आहे आणि धूळ व उष्णता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत कार्यक्षमतेने काम करण्यासाठी तिची रचना केली आहे.

  4. ५०८ मिमी (वीस इंच) बॅरल आहे.

  5. फायर रेट प्रति मिनिट सहाशे ते साडेसातशे राउंड्स आहे.

  6. एलएमजी असॉल्ट ड्रम, बेल्ट चेन किंवा मॅगझिनला सपोर्ट करते.


Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा