नालेसफाईतील हातसफाई एआयमुळे समोर, मागील वर्षी तब्बल १२ ते १५ कोटींचा झाला कंत्राटदारांना दंड

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. कंत्राटदारांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवण्यासाठी मागील वर्षीपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असला या तंत्रज्ञानामुळे महापालिकेचे तब्बल १२ ते १५ कोटींची रक्कम दंड स्वरुपात आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञानामुळे नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्याप्रमाणात पारदर्शक येत असून त्याच माध्यमातून त्यांची प्रत्येक चोरी पकडून त्यांना दंड आकारला जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी छोट्या,मोठ्या आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी सन २०२५ आणि २०२६ या कालावधीमध्ये कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. मात्र, या नालेसफाईच्या या कंत्राट कामांमध्ये यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करता जिओ फेन्सिंगचा अवलंब केल्यामुळे गाळ काढण्यापासून ते गाळाची विल्हेवाट लावण्यापर्यंत आणि गाळाच्या वजनापासून ते त्यांच्या देयकांपर्यंत विशेषत: एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ज्यामुळे प्रत्येक बाबींचा डेटाबेस तयार झाला आणि या डेटाबेसचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही दंडाची रक्कम १२ ते १५ कोटींचा दंड लावला असल्याचे स्थायी समितीच्या सभेत सादरीकरणादरम्यान अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यामुळे यातील सक्रिय गैरप्रकार यामाध्यमातून कमी झाला असून असे प्रकार जिथे आढळून येतो, तिथे एआय प्रणालीच ती निदर्शनास आणून देत असल्यामुळे त्यातून असे प्रकार उघडकीस येत त्यांना दंड आकारला जातो .त्यातूनच असे प्रकार वारंवार झाल्यास सबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकले जाते.


मिठी नदीतील गाळ काढल्यानंतर त्याचे वजन काट्यावर वजन केल्यानंतर नियोजित डम्पिंग ग्राऊंडवर त्याची विल्हेवाट लावली जाते. यामध्ये जिओ फेन्सिंग केल्यामुळे वाहनात गाळ अपलोड झाल्यापासून वाहन निघालेला मार्ग आणि डम्पिंग ग्राऊंड याचा मार्ग हा जीआयएस प्रणालीद्वारे दिसत असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्यास दिसून येते.


आज जेवढा गाळ वजन काट्यावर मापन केला जातो, तेवढ्याच गाळाचे पैसे दिले जातात. त्यामुळे नाल्यातून अथवा मिठी नदीतून गाळ काढल्यानंतर ४८ तासांमध्ये तो सुकल्यानंतर उचलून नेणे बंधनकारक आहे. कारण मिठी नदीतून किती गाळ काढला यापेक्षा तो वाहून किती नेला याचा आकडा वजन काट्यावर दिसेल, त्याच आधारे त्यांच्या देयकांचे अधिदान केले जाते. नाल्यासह मिठी नदीतील गाळ काढल्यानंतर त्यांचे फोटो व व्हिडीओ अपलोड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन्सही उपलब्ध करून दिले आहे


नव्याने जिथे जिथे नाले सफाईची कामे हाती घेतल्यानंतर याची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना देण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार प्रत्येक नाल्याच्या कामांमध्ये याची माहिती लोकप्रतिनिधींना दिली जाईल असे आश्वासनही बांगर यांनी दिले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४