आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हवाला देत, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, त्यांनी एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक अमेरिकन एमक्यू-९ ड्रोन पाडले आहे. मात्र, अमेरिकेने याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार ( Tasnim News Agency), इराणी नागरिक आणि औद्योगिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. आयआरजीसीचा (IRGC) दावा आहे की, त्यांनी 'व्याप्त प्रदेशां'मधील अमेरिकी-इस्रायली तळांना लक्ष्य केले.

आयआरजीसीकडून एफ-१६ जेट पाडल्याचा दावा

आयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला. आयआरजीसीने एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानावर हल्ला केल्याचाही दावा केला आहे, मात्र झालेल्या नुकसानीचा किंवा त्याच्या ठिकाणाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

अमेरिकेने या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही

मात्र, अमेरिकेकडून या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सध्या दोन्ही बाजूंनी माहिती युद्धही (Information War) सुरू आहे.

मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका एकमेकांवर हल्ले करत आहेत. हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, इराणसोबत सुरू असलेले इस्रायल-अमेरिकेचे युद्ध केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर संपेल यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि