Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, याआधी धुरंधर रिलीज झाल्यानंतर रहमान डकैत अर्थात अक्षय (Akshaye Khanna) खन्नाची चर्चा जोरदार रंगलेली. धुरंधर २ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी रहमान डकैतची आठवण काढली. धुरंधरमध्ये रहमान डकैतची भूमिका साकारलेल्या अभिनेता अक्षय खन्नानं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडलीय. पण, धुरंधर सिनेमात अक्षय खन्नाचा मृत्यू झाल्याचं दाखवलंय आणि सिनेमाच्या पटकथेतलं त्याचं पात्र तिथेच संपलं.


मात्र, आता अक्षय खन्ना पुन्हा एका नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच अक्षय खन्ना एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अभिनेता अक्षय खन्नाचा ५१ वा वाढदिवस पार पडला. त्यानिमित्तानं अक्षयच्या आगामी सिनेमातला त्याचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयचा हा लूक एका तेलुगू सिनेमातला असून बॉलिवूड गाजवणारा अभिनेता अक्षय खन्ना आता साऊथ इंडस्ट्रीत झळकणार आहे.


अक्षयचा हा लूक रहमान 'रहमान डकैत'च्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा असून 'महाकाली' या आगामी सिनेमात दिग्दर्शक प्रशांत वर्मांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यात अक्षय खन्नाचा हटके लूक पाहायला मिळाला.


दिग्दर्शकानं आता सेटवरील एक BTS फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता अक्षय खन्ना गुरू शुक्राचार्यांच्या वेशात दिसत असून लांब पांढरे केस, दाढी, तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळ्यांसह अक्षयचा हा लूक पाहून अभिनेत्याला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.


अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत वर्मांनी एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षय खन्ना सर... खरा कलाकार तोच, ज्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी गाजावाजाची गरज नसते. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स, दमदार अभिनय आणि वेगळेपणा नेहमीच अगदी ठळकपणे दिसून येतो. तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण मिळून केलेलं काम जगासमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. लवकरच आणखी अपडेट्स देऊ..."





हिंदू पौराणिक कथेनुसार शुक्राचार्य हे असुरांचे गुरु मानले जातात आणि त्यांना 'मृतसंजीवनी' मंत्राचे ज्ञान असल्याचं सांगितलं जातं, ज्यामुळे मृतांना पुन्हा जीवदान देता येतं. 'महाकाली' या सिनेमाची कथा एका महिला सुपरहिरोभोवती फिरते. ही ताकदवान नायिका वाईट शक्तींविरुद्ध लढत न्याय प्रस्थापित करण्यासाठी सज्ज होते. अभिनेता अक्षय खन्नाचा हा दमदार लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Miley Cyrus Maxx Morando marriage : पॉप स्टार मायली सायरस आणि संगीतकार मॅक्स मोरांडो अडकले विवाहबंधनात; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कॅलिफोर्नियात पार पडला खाजगी विवाह सोहळा वॉशिंग्टन : प्रसिद्ध हॉलिवूड पॉप गायिका

Rakesh Bedi: 'एक दुजे के लिए'च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, 'धुरंधर'पेक्षा मोठा हिट होता

Rakesh Bedi: बॉलिवूड अभिनेता राकेश बेदी यांचा 'धुरंधर' आणि 'धुरंधर द रिव्हेंज'मधील जमील जमाली ही भूमिका प्रेक्षकांना खूप

Manoj Bajpayee on Dhurandhar : मनोज बाजपेयींचं बॉलिवूडला समर्थन; 'धुरंधर'सह अनेक चित्रपटांवर चर्चा

Manoj Bajpayee on Dhurandhar : प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे 'धुरंधर' या चित्रपटावरील वक्तव्य साध्य मोठ्या प्रमाणावर

Malvika Gaekwad: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!

[caption id="attachment_1078084" align="alignnone" width="800"] 1. सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूजमालविका सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने पती

Orry Viral Photo: ऑरीच्या सिग्नेचर पोझवरून नवा वाद; अनन्या पांडेसोबतचा फोटो व्हायरल

Orry Viral Photo: ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर

Sapna Choudhary Divorce: सहा वर्षांच्या संसारात दुरावा! सपना चौधरी पती वीर साहूपासून घेणार घटस्फोट

हरियाणवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव असलेली गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे