Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरगम चौक परिसरात एका कारमधून तब्बल ३ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?


शहरातील सरगम चौक परिसरातून एक कार अत्यंत भरधाव वेगाने जात असताना पोलिसांच्या नजरेस पडली. संशय आल्याने पोलिसांनी तातडीने या कारचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, सरगम चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे संशयित कारला थांबावे लागले. याचा फायदा घेत पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यात सुमारे ४ किलो गांजा सापडला. ३ किलो ९०० ग्रॅम (किंमत सुमारे ७९ हजार रुपये) गांजा सापडला तर ज्या कारणे घेऊन चाललेले कार ५ लाख किमतीची होती. पोलिसांनी सुमारे ५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कारचालक माणिक चौगुले याला ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई पंढरपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून, "शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम सुरू राहील," अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा