समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले तसेच नियमानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.



एका कंत्राटी कामावर मजुरी करत असलेल्या महिला पिकअपमध्ये बसल्या होत्या आणि पुढील प्रवासाला निघणार होत्या. या उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना समृद्धी महामार्गावर जालना परिसरात जामवाडी शिवारात घडली. पिकअपला धडक देणारा ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता. ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअपमधील काही महिला धक्क्याने बाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकखाली चिरडल्या गेल्या. मृतदेह रस्त्यावर इतस्ततः पडले होते. जेवणाचे डबे, चपला इत्यादी साहित्य विखुरले होते. ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा झाला. अपघातात मृत्यू झालेल्या सर्व महिला या बदनापूरमधील केळीगव्हाण गावच्या आहेत.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा