केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरली आहे. नवती हंगाम सुरू होण्यापूर्वीच केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सध्या बाजारभावात ५०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे.


गेल्या वर्षी याच कालावधीत केळीला २००० रुपयांहून अधिक दर मिळत होता. मात्र यंदा दर निम्म्याहून कमी झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.दरम्यान, केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला. यावल तालुक्यातील न्हावी तसेच आसपासच्या गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली