कुंभमेळ्याच्या रिंग रोडला असलेला अडथळा अखेर संपला

उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यश


नाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून पडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले असून या प्रकरणात पहिली खरेदी झाली आहे आणि महिला शेतकरी कोट्याधिश झाली .


कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन ६६.१५ किलोमीटर लांबीच्या नाशिक वर्तुळाकार मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. चार ते सहा पदरी हा मार्ग शहरालगतच्या २५ गावांतून जाणार आहे. डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग ६०) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाईल. चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्य महामार्गांना जोडणारा हा मार्ग शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यात तसेच सिंहस्थ काळात अखंड वाहतूक सुलभ करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ३६५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून त्यात काही शासकीय जमिनीचाही समावेश आहे. भूसंपादनात नोटीससाठी १५० दिवसां कालावधी असतो. थेट खरेदीच्या माध्यमातून अवघ्या ६७ दिवसांत या जागेची खरेदी दृष्टीपथास आली.


प्रशासनाने रेडी रेकनरच्या चार पट आणि २५ टक्के अधिक मोबदला देऊन थेट खरेदीची तयारी दर्शविली. तीन वर्षांत त्या भागात जागांना मिळालेल्या दरांचे (खरेदीखत) अवलोकन करून अधिकाधिक मोबदल्याचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. थेट खरेदीत सहभागी होण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या थेट खरेदीला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. इंदुबाई गायकवाड यांची दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथील ३३ गुंठे जागा शासनाने या माध्यमातून खरेदी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गायकवाड यांना मोबदल्यापोटी तीन कोटी १९ लाख ६५ हजार ४२० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंग भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. थेट खरेदीला प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नाशिक वर्तुळाकार मार्गासाठी ७० वर्षीय इंदुबाई गायकवाड या जमीन देणाऱ्या पहिल्या शेतकरी ठरल्या. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.



उपजिल्हाधिकारी वाघांनी केलेली मध्यस्थी यशस्वी


अवघ्या 67 दिवसांमध्ये नोटीस दिल्यानंतर ही खरेदी झाली आहे या भागातील शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये विरोध होता पण भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जी मेहनत घेतली शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले त्याची पूर्तता केली त्यांच्यावरती विश्वास ठेवून या भागातील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला असलेला विरोध हा कमी केला आणि त्यामुळे जो अडथळा होता तो दूर करण्यात मोठ्या प्रमाणावर ती उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जी निर्माण झालेली कोंडी होती ती मात्र फुटली.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि