BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांसारख्या खुणा झाल्या आहेत. अशातच आता खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बर याच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. एक पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.



खालिस्तानी दहशतवाद्याच्या पोस्टमध्ये काय?


या हल्ल्याची जबाबदारी एका खालिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे. त्याच्या वतीने असे लिहिले आहे की – सुखजिंदर सिंग बब्बर १ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड सेक्टर-३७ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतो. आम्ही भारतीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की, पंजाबमधील शीख तरुणांना संपवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी, दशमेश पित्याचा खालसा पंथ याला सडेतोड उत्तर देईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे- गुरदासपूरमध्ये रणजीत सिंगच्या मारेकऱ्यालाही सोडले जाणार नाही. पंजाबची भूमी खालसाची भूमी आहे. पंजाबमध्ये खलिस्तान बनेल. खलिस्तान जिंदाबाद. खालसा राज्य करेल.



नेमकं प्रकरण काय ?


चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार - पाचच्या सुमारास चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


पोलिसांकडून नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.



रणजीत सिंग कोण आहे?


२२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरदासपूरमधील एका गावात एका एएसआय आणि एका होमगार्ड जवानाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रणजीत सिंग नावाच्या तरुणाला पकडले. पोलिसांनी सांगितले होते की, त्यानेच दोघांची हत्या केली. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय हँडलर्सशी संबंध आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी रणजीतला हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. कुटुंबाचा आरोप होता की हा बनावट एन्काउंटर आहे. १२ दिवसांपर्यंत कुटुंबाने अंत्यसंस्कार केले नव्हते. या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि