संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीचे आणि आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदीत एक एक्स पोस्ट (X Post or Tweet) केली आहे. 'शब्द नहीं शक्ति है अरिदमन' अशा स्वरुपाची सूचक पोस्ट संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. अरिदमन हा केवळ एक शब्द नाही, ती शक्ती आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.





एल अँड टीने विशाखापट्टणम येथील गुप्त जहाजबांधणी केंद्रात अणुऊर्जेवर चालणाऱ्या आयएनएस अरिदमन पाणबुडीची निर्मिती केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून समुद्रात या पाणबुडीच्या चाचण्या सुरू होत्या. नौदलात सहभागी झाल्यावर ही पाणबुडी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत कार्यरत राहणार आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत २०१६ पासून आयएनएस अरिहंत आणि २०२४ पासून आयएनएस अरिघात कार्यरत आहे. आता स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत आजपासून आयएनएस अरिदमन ही तिसरी पाणबुडीही कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पाणबुड्या अणुऊर्जेवर चालत असल्यामुळे दीर्घकाळ खोल समुद्रात लपून शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे आणि योग्य वेळी घातक प्रहार करणे यासाठी सक्षम आहेत.


अणुऊर्जेवर चालणारी आयएनएस अरिदमन ही सात हजार टन वजनाची पाणबुडी आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या सहा हजार टन वजनाच्या पाणबुड्या होत्या. या दोन्ही पाणबुड्यांपेक्षा आयएनएस अरिदमन महाकाय आणि शक्तिशाली आहे. पूर्वीच्या पाणबुड्यांवरील चारच्या तुलनेत, या पाणबुडीमध्ये आठ व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम (VLS) ट्यूब आहेत, ज्यामुळे ती चोवीस के-१५ सागरिका ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे (७५० किमी) आणि आठ के-४ मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे (३५०० किमी) तैनात करू शकते. तसेच, ती सहा हजार किमी पल्ल्याची के-५ क्षेपणास्त्रे देखील पाणबुडीत सामावून घेऊ शकते.


तब्बल ८३ मेगावॅट क्षमतेच्या कॉम्पॅक्ट लाईट वॉटर रिअॅक्टरवर चालणारी ही पाणबुडी तिच्या रचनेमुळे रडारला चकवू शकते. कमीत कमी आवाज करत ही पाणबुडी दीर्घकाळ प्रभावीरित्या कार्यरत राहू शकते. या पाणबुडीत सात पात्यांचा प्रोपेलर आहे, ज्यामुळे पृष्ठभागावर १२-१५ नॉट्स (सागरी मैल) आणि पाण्याखाली २४ नॉट्सचा (सागरी मैल) वेग मिळतो. प्रगत स्वदेशी सोनार प्रणाली उशूस (USHUS) आणि पंचेंद्रिय, तसेच अ‍ॅनेकोइक टाइल्समुळे या पाणबुडीची गुप्तता आणि शोध क्षमता वाढते.





संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते आज आयएनएस तारागिरी स्टेल्थ फ्रिगेटचेही जलावतरण होणार आहे. याप्रसंगी गोदीचे (डॉकमधील) वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक नौदल अधिकारी उपस्थित असतील.


प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत विकसित करण्यात आलेली तारागिरी ही चौथी स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ६,६७० टन वजनाची युद्धनौका आहे. तिच्या रचनेमुळे ती रडारला चकवू शकते. या क्षमतेमुळे दीर्घकाळ ही फ्रिगेट समुद्रातील कठीण परिस्थितीतही सुरक्षित राहू शकते. ही नौका ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बांधली आहे. आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या फ्रिगेटमध्ये सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहेत. समुद्रातून समुद्रात तसेच समुद्रातून आकाशात आणि समुद्रातून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि