पश्चिम आशियातले युद्ध आणखी पेटणार, अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील सर्वात मोठा उंच पूल नष्ट; ८ मृत्यू, ९५ जखमी


तेहरान  - आखाती देशात अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आताच वेळ आहे, इराणनं तडजोड करावी अन्यथा त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर या दोन्ही देशात तणाव वाढला. ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियन यांनी प्रत्युत्तर दिले. इराण अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी पूर्ण तयार आहे. आम्ही पूर्ण क्षमता वापरू. इराण मागे हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले.


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका इस्रायलने इराणमधील सर्वात मोठा उंच पूल नष्ट केला आहे. इराणला पाषाण युगात पाठवण्याच्या धमकीनंतर अमेरिकेने काही तासांत हा हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, अलबोर्ज परिसरातील हा बी-१ ब्रिजवर मोठा हल्ला झाला. त्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यात कमीत कमी ८ लोक मारले गेलेत तर ९५ लोक जखमी झालेत अशी माहिती दिली. सातत्याने होणारे हल्ले पाहता आखाती प्रदेशातील तणाव शांत होण्याऐवजी आणखी चिघळण्यासाठी शक्यता वर्तवली जात आहे.


इराणने इस्रायलची 'हेर' तयार करणारी फॅक्टरी क्षेपणास्त्राने उडवली : स्रायलच्या संरक्षण दलासाठी 'डोळे आणि कान' तयार करणारी फॅक्टरी इराणने उडवली आहे. पेताह टिकवा शहरात असलेल्या इस्रायलच्या 'एयरोसोल' या नामांकित कंपनीच्या ड्रोन फॅक्टरीवर इराणने अचूक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. ही कंपनी हाय-टेक टेहळणी ड्रोन आणि त्यांचे सुटे भाग तयार करते. इराणचे क्षेपणास्त्र थेट फॅक्टरीवर आदळले. 'एयरोसोल' ही इस्रायलची प्रमुख एरोस्पेस कंपनी असून ती मानवरहित विमान यंत्रणा, त्याचे सुटे भाग आणि पूर्ण तंत्रज्ञान विकसित करते. आता या फॅक्टरीवर झालेल्या हल्ल्यामुळे नवीन ड्रोन आणि त्यांच्या पार्ट्सची निर्मिती थांबणार आहे. इस्रायल सध्या इराणविरुद्ध सतत ड्रोन मोहिमा राबवत आहे, अशा वेळी नवीन ड्रोन मिळण्यास उशीर होणे ही इस्रायलसाठी धोक्याची घंटा आहे. ‘एयरोसोल’ कंपनी केवळ इस्रायललाच नाही, तर अमेरिका आणि इतर मित्रदेशांनाही ड्रोनचा पुरवठा करते.


डोनाल्ड ट्रम्प यांनी पेटंट औषधांवर लादले १०० टक्के टॅरिफ : आयात शुल्कात भरमसाठ वाढ करुन जागतिक बाजारपेठ हादरवून सोडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषधनिर्माण क्षेत्रावर निर्बंध लादले आहेत. यावेळी ट्रम्प यांनी औषधे आणि धातूंच्या आयातीला लक्ष्य केल आहे. अमेरिकेने देशाबाहेर बनवलेल्या पेटंट औषधांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादले आहे. तसेच प्रमुख धातूंवरील नियमही अधिक कडक केले आहेत. ट्रम्प सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात देशाबाहेर बनवलेल्या पेटंट असलेल्या औषधांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्यात आले आहे. औषध कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यास प्रवृत्त करण्याचा या निर्णयामागे उद्देश आहे. तसेच, कंपन्यांना आयात शुल्कात काही प्रमाणात किंवा पूर्ण सवलत मिळविण्यासाठी किंमती कमी करण्याची अथवा उत्पादन अमेरिकेत सुरु करण्याची हमी द्यावी लागणार आहे.


ट्रम्प यांना सुनावताच फ्रान्सच्या जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणविरोधातील युद्धाबाबतच्या भूमिकेवर टीका केली होती. यानंतर एक मोठा बदल घडला असून, फ्रान्सच्या मालकीच्या एक कंटेनर जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली आहे. त्यामुळे आता इराण फ्रान्सला आपला शत्रू देश मानत नसल्याचे संकेत मिळत आहेत. मरीनट्रॅफिकच्या ट्रॅकिंग डेटानुसार फ्रेंच शिपिंग ग्रूप ‘सीएमए सीजीएम’च्या मालकीचे आणि माल्टाचा ध्वज असलेल्या क्रिबी या जहाजाने २ एप्रिल रोजी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या मार्गावरून प्रवास करणारे हे पहिलेच फ्रान्सच्या मालकीचे जहाज आहे.


अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने देशाच्या मध्यवर्ती भागात अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. “आयआरजीसीच्या नवीन एअरोस्पेस फोर्स एअर डिफेन्स सिस्टमने अमेरिकेचे पाचव्या पिढीच्या दुसऱ्या एफ-३५ विमानाला लक्ष्य केले आणि ते मध्य इराणमध्ये पाडण्यात आले. विमान जमिनीवर कोसळताना आणि अपघातादरम्यान झालेला प्रचंड स्फोट पाहता वैमानिक विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडल्याची शक्यता कमी आहे,” अशी माहिती खातम अल-अंबिया हेडक्वार्टर्सच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे