बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच आपल्याला या आंब्यांची चव चाखता येते, त्यामुळे संपूर्ण बाजार पिवळ्या आंब्यांची भरून जातो. पण हेच पिवळे धम्मक आंबे आपल्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार हैद्राबादमधून समोर आला आहे.



हैद्राबादमध्ये प्रकार उघडकीस


हैद्राबादच्या बाजारपेठेत बनावट आंब्याचा सुळसुळाट पसरला आहे, आणि आंबे खाल्ल्याने अनेक लोक आजारी पडत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी अचानक धड टाकत एका फळ विक्रेत्याकडून तब्बल २०० किलो बनावट आंबे हे जप्त केले आहेत. हैद्राबाद पोलिसांनी कडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.



बनावट आंबे कसे पिकवले जातात?


हाती आलेल्या माहितीनुसार हैद्राबाद खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागात छापे टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईदरम्यान अनेक धक्कदायक प्रकार उघडकीस आले. ग्राहकांच्या शरीराशी खेळले जाणारे आंबे हे कॅल्शिअम कार्बोइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत.



असे आंबे शरीरासाठी किती धोकादायक


रसायनांचा अति प्रमाणात वापर करून आंबे बाजारात विकले जात होते. कॅल्शियम कार्बोइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घास खवखवणे, पोटात दुखणे उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्था आणि श्वसनाचा गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.



प्रशासनाचे आवाहन


उन्हाळात आंब्यांची मागणी ही वाढत जाते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन जास्त आणि लवकर पैसे कमवण्यासाठी फळ विक्रेते बनावट आंबे विकून ग्राहकांना फसवतात. आणि याचा परिणाम ग्राहकांच्या शरीराशी होतो. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी काही संशयास्पद आढळ्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करत असल्याने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान