Rain Alert: दिल्लीत पुन्हा पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा; आणखी कोणत्या राज्यात बरसणार?

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिल्लीसाठी पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, आणखी एक पश्चिमी प्रणाली सक्रिय असून, तिचा प्रभाव ७ आणि ८ एप्रिल रोजी सर्वाधिक दिसून येईल. यामुळे मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत पावसाची दाट शक्यता आहे. दरम्यान, सध्याच्या सक्रिय पश्चिमी प्रणालीमुळे देशाच्या वायव्य भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. जम्मू आणि काश्मीरच्या डोंगराळ भागात गेल्या अनेक दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे.


मंगळवारसाठी 'यलो अलर्ट' जारी



दरम्यान, आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी केला असून, दिवसा एक किंवा दोन वेळा अतिशय हलक्या पावसाच्या सरी, तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी संध्याकाळी हलक्या पावसाची आणखी एक सर अपेक्षित आहे.


हिमाचलमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस
हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी झाली, ज्यामुळे किमान आणि कमाल तापमानात घट झाली. शनिवारी शिमला हवामान कार्यालयाने ७ आणि ८ एप्रिल रोजी चार ते पाच जिल्ह्यांमध्ये गारपिटीच्या शक्यतेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार संध्याकाळपासून गेल्या २४ तासांत लाहौल स्पिती आणि कुल्लूच्या उंच भागांमध्ये नवीन हिमवृष्टी झाली. गोंडलामध्ये १३ सेमी, हान्सा आणि केलाँगमध्ये ७.५ सेमी आणि कोक्सरमध्ये ३ सेमी बर्फवृष्टी झाली. शुक्रवारी रात्री अटल बोगद्याजवळही हलकी हिमवृष्टी झाली. राज्याच्या विविध भागांमध्ये अधूनमधून पावसाची नोंद झाली.


राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पाऊस



राजस्थानमधील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे गेल्या २४ तासांत अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाऊस सुरूच राहील. हवामान विभागाने सांगितले की, गेल्या २४ तासांत पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये आणि पश्चिम राजस्थानच्या इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस झाला. या कालावधीत सर्वाधिक पाऊस पश्चिम राजस्थानमधील करणपूर येथे ११.५ मिमी आणि पूर्व राजस्थानमधील उदयपूरच्या कोटाडा येथे ३२ मिमी झाला. विभागाच्या माहितीनुसार, आज जयपूर, अजमेर, भरतपूर, कोटा आणि उदयपूरच्या काही भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाच्या वाऱ्यासह जोरदार मेघगर्जना, पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. बिकानेर आणि जोधपूर विभागांच्या बहुतांश भागांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात