Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घरकाम करून उदरनिर्वाह करत असून, तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि अत्याचारामुळे ती माहेरी राहत असताना आरोपी अक्षय गवळी याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत २०२२ पासून वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तसेच फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडितेला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहूनही आरोपीने तिचे शोषण सुरूच ठेवले.


दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याचे समजताच पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले. त्यानंतरही आरोपीने पीडितेला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(2)(m) अन्वये गुन्हा रजि नं. २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे करत आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.