OBC विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच मिळणार स्वतंत्र्य वसतिगृह; ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षांची घोषणा

OBC Student: ओबीसी आरक्षणासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.

मुंबई: शासकीय नोकऱ्यांमधील ओबीसींच्या अनुशेषाचा मुद्दा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कळीचा ठरला असून, मंत्री छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी मागणी केल्यानुसार या अनुशेषाची सविस्तर व अचूक माहिती घेण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत उपसमितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.



बावनकुळे म्हणाले की, अर्थ व सांख्यिकी विभागाने दिलेल्या अहवालानुसार मंजूर 7 लाख 35 हजार 573 पदांपैकी 5 लाख 10 हजार 824 पदे भरली असून 2 लाख 24 हजार 749 जागा रिक्त आहेत. मात्र,छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी मागणी केल्यानुसार या अनुशेषाची सविस्तर व अचूक माहिती घेण्यात येईल. ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील. विविध महामंडळांच्या नियुक्त्या, त्यांना बजेट देणे व विविध प्रश्न तातडीने निकाली काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ओबीसी समाजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.


 


मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे आणि जल व मृदसंधारणमंत्री संजय राठोड आणि मंत्रालयातील ओबीसीसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय वसतिगृहे आणि 'महाज्योती'च्या कार्यालयांसाठी महसूल विभागातर्फे 1 रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यापैकी 22 जिल्ह्यांत जागा मिळाल्या असून, उर्वरित १४ जिल्ह्यांतील जागा महिनाभरात उपलब्ध करून दिल्या जातील. वसतिगृहांच्या उत्कृष्ट डिझाइन व नियोजनासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला सहा आर्किटेक्ट नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.



शिवाय, पुण्यातील प्रस्तावित एकत्रित संकुल आणि मुंबईतील गोरेगाव-आरे येथील दुग्ध विकास विभागाच्या 'न्यूझीलंड वसतिगृहा'तील 80 खोल्यांचा ताबा ओबीसी वसतिगृहासाठी घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तेथे 150 विद्यार्थ्यांची सोय होईल. याशिवाय, सीबीएसई (CBSE) व आयसीएसई (ICSE) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीचा समावेश करण्याबाबतही शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 21 योजना विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले जातील. तसेच, विविध दुष्काळी उपाययोजनांना महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलेल्या 'कॅम्प व्यतिरिक्त जागांबाबत' महसूलमंत्र्यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली. तसेच 18 पगड जाती व व्हीजेएनटीच्या 43 समाजांकडून येणाऱ्या निवेदनांवर उपसमिती दर आठवड्याला निर्णय घेत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित आणि धर्मरक्षण मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित

DCM Eknath Shinde: धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वचन

मुंबई: सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन

दुष्काळी भागातील स्थानिक लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऐतिहासिक बारव संवर्धन करून त्यातील जलस्रोत

कृषी, आरोग्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार करोडोंची गुंतवणूक, महिलांना मिळणार हाती रोजगार

मुंबई: उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याच्या सर्वांगीण

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी