नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित आणि धर्मरक्षण मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी संवाद साधला.

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी संवाद साधला.



यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आपल्या एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्राची एकता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना बाधा पोहोचविण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत आहेत. ही लढाई केवळ विचारांची नसून देशाची एकता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची आहे.



देशात ‘जय श्रीराम’ म्हणण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक आहे. आपण जागरूक राहिलो नाही, तर भविष्यात आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा येऊ शकते. त्यामुळे आपल्या धर्माचे, संस्कृतीचे आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी संघटित, सक्षम आणि जागरूक राहावे. राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी युवकांनी सकारात्मक भूमिका बजावत समाजात एकजुटीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.



या कार्यक्रमास आमदार परिणय फुके, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, नागपूरच्या महापौर सौ. ठाकरे, आमदार खोपडे, विदर्भ संघटन प्रमुख कोठेकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, आमदार पोतदार, स्थायी समिती अध्यक्ष  शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, रिषभ अरखेल, कुलदीप माटे, संपर्क महामंत्री नागेश साठवणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde: धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वचन

मुंबई: सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन

दुष्काळी भागातील स्थानिक लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऐतिहासिक बारव संवर्धन करून त्यातील जलस्रोत

OBC विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच मिळणार स्वतंत्र्य वसतिगृह; ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षांची घोषणा

मुंबई: शासकीय नोकऱ्यांमधील ओबीसींच्या अनुशेषाचा मुद्दा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कळीचा ठरला असून,

कृषी, आरोग्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार करोडोंची गुंतवणूक, महिलांना मिळणार हाती रोजगार

मुंबई: उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याच्या सर्वांगीण

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी