दुष्काळी भागातील स्थानिक लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

राज्यातील दुष्काळग्रस्त भागात सांस्कृतिक कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च टाळून स्थानिक लोककलावंतांना थेट कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऐतिहासिक बारव संवर्धन करून त्यातील जलस्रोत मोकळे करण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च टाळून स्थानिक लोककलावंतांना थेट कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध उपक्रमांचा आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी , फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


बारव संवर्धनासाठी जलस्त्रोत मोकळे करण्यावर भर


बारवांच्या कामांमध्ये केवळ बांधकाम किंवा सुशोभीकरणावर भर न देता गाळ काढून जलस्रोत मोकळे होतील आणि पाणी उपलब्ध होईल, अशा कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वॉटर टाईटनिंगची दुरुस्तीही करावी. हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देऊन कामांचा क्रम निश्चित करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

 



जालना येथील एका ऐतिहासिक पुष्करणीतून 70 ट्रक गाळ काढल्यानंतर तेथे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. याच धर्तीवर विभागीय स्तरावर चार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 16 ठिकाणी बारवांची कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांचे तसेच भविष्यातील कामांचे कामापूर्वीचे आणि कामानंतरचे छायाचित्रे व व्हिडिओंच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.


दुष्काळग्रस्त तालुक्यांतील लोककलावंतांना प्रथम प्राधान्य


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पातील मोठ्या सोहळ्यांवरील आणि अनावश्यक सजावटीवरील खर्चाला मर्यादा घालण्यात यावी आणि हा निधी दुष्काळी भागातील लोककलावंतांच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील स्थानिक कलाकारांना संधी देण्यासाठी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून कलाकारांचे अर्ज मागविण्यात यावेत. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे नोंदणीकृत संस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. कार्यक्रमांचे वाटप करताना कलाकारांना थेट काम देण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मराठी भाषा अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून संनियंत्रण यंत्रणा उभारावी. कार्यक्रमांचे अहवाल, छायाचित्रे आणि अन्य नोंदी जतन कराव्यात. पुढील १५ दिवसांत या कार्यक्रमांची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीत जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या तिन्ही बाबींचा समन्वय साधून सांस्कृतिक कार्य विभागाने नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी निर्देशित केले.
Comments
Add Comment

नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित आणि धर्मरक्षण मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित

DCM Eknath Shinde: धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वचन

मुंबई: सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन

OBC विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! लवकरच मिळणार स्वतंत्र्य वसतिगृह; ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षांची घोषणा

मुंबई: शासकीय नोकऱ्यांमधील ओबीसींच्या अनुशेषाचा मुद्दा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत कळीचा ठरला असून,

कृषी, आरोग्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार करोडोंची गुंतवणूक, महिलांना मिळणार हाती रोजगार

मुंबई: उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याच्या सर्वांगीण

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

PAT Exam: ‘पीएटी’ परिक्षेची तारीख आली, विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी