Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या काकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर पाटणा येथील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.



आईशेजारी झोपलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून...


शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास, जेव्हा एक ३ वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत गाढ झोपेत होती, तेव्हा तिच्या सख्ख्या काकानेच तिचे अपहरण केले. नराधम काकाने तिला जवळच्या एका शेतात नेले आणि तिथे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करत पीडितेला रुग्णालयात दाखल केले असून, आरोपी काका आणि त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



नशेत धुंद काकाचा नराधम अवतार...


पीडित मुलीच्या आईने सांगितलं की, मुलगी रात्री घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचा नशेच्या आहारी गेलेला काका घरी आला. त्याने मुलीला उचलून नेले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन शेतात नेऊन त्याने आपल्या दोन मित्रांसह या निष्पाप बालिकेवर सामूहिक अत्याचार केला. सुदैवाने, जवळच असलेल्या मत्स्यपालन तलावावर राखण करणाऱ्या एका व्यक्तीने चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि आरडाओरडा सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने नराधम आरोपी पीडितेला तिथेच सोडून पळून गेले. इकडे आईला जाग आली तेव्हा मुलगी गायब असल्याचे पाहून तिने टाहो फोडला. शोधाशोध केली असता मुलगी रक्ताळलेल्या अवस्थेत शेतात सापडली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एका फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी