Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट


दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा घडवून आणण्याचा कट रचल्याने त्यांनी कुर्ला मधून एका १८ वर्षीय मुलाला अटक केली आहे.


दिल्लीत टॉय कारच्या माध्यमातून घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला असून या प्रकरणात मुंबईतील कुर्ला येथून १८ वर्षीय हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत ही अटक केली.


अटक झालेल्या हमासच्या वडिलांनी, जलालुद्दीन सिद्दीकी यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ३ तारखेला पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास १८ ते २० अधिकारी त्यांच्या घरी आले आणि हमासला ताब्यात घेऊन गेले. “माझा मुलगा नुकताच १८ वर्षांचा झाला आहे. तो एक विद्यार्थी आहे, गुन्हेगार नाही. तो अभ्यासू असून दहावीत त्याला ७६ टक्के गुण मिळाले होते,” असे त्यांनी सांगितले.


गेल्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन गेम खेळताना त्याचा काही लोकांशी संपर्क झाला असावा, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचेही त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्समधूनच हे संपर्क जुळले असावेत, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले.


 

हमास काही संशयितांच्या संपर्कात होता आणि दिल्लीत घातपाताचा कट रचण्यात त्याचा सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत बोलताना त्याच्या वडिलांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून न आल्याचे स्पष्ट केले.


“गेल्या काही महिन्यांत त्याचे फोन कॉल्स वाढले होते. त्याची आईनेही याकडे लक्ष वेधले होते. तो बराच वेळ फोनवर बोलत असे, कधी बाहेर जाऊनही बोलत होता. आम्ही त्याला याबाबत विचारणा केली आणि अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यानेही होकार दिला होता. पण याशिवाय कोणतीही संशयास्पद कृती आम्हाला आढळली नाही,” असे जलालुद्दीन यांनी सांगितले.


तपास यंत्रणांच्या दाव्यांना त्यांनी फेटाळून लावत, “ही सर्व माहिती एजन्सीकडून पसरवली जात आहे. माझा मुलगा असा नाही,” असेही त्यांनी ठामपणे म्हटले.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?