Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. बॉलीवूडमधील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक ठरलेला रामायण गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून आता या सिनेमात आणखी एका मोठ्या कलाकाराची एंट्री होणार असल्यानं या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. हा कलाकार अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जावई असल्याचं समोर येत आहे. अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) रामायण सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.


माहितीनुसार अभिनेता कुणाल कपूर या सिनेमात ‘इंद्रदेवाची भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती, पण आता पुन्हा एकदा याबाबत चर्चा होत आहे. मात्र, सिनेमाच्या टीमकडून किंवा मेकर्सकडून याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कुणाल कपूरनेही यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


अभिनेता कुणाल कपूर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये झळकला असून तो एक उत्तम कलाकार आहे. कुणालने नैना बच्चन सोबत लग्न केलं असून नैना ही अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे.


रामायण सिनेमात ‘रावण’ची भूमिका साकारणारा साऊथ स्टार यश आणि ‘इंद्रदेवा'च्या भूमिकेत दिसणारा कुणाल कपूर यांच्यात जबरदस्त युद्ध दाखवले जाणार असल्याची चर्चा असून हा सीनमध्ये प्रेक्षकांना भव्य आणि थरारक अनुभव मिळणार आहे. या सिनेमात काजल अग्रवाल ‘मंदोदरी’च्या भूमिकेत तर शीबा चड्ढा, आदिनाथ कोठारे आणि अरुण गोविल यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता रामायण सिनेमा मोठ्या पदड्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या