Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने त्यांनी राज्यसभा खासदार पदाची हॅट्ट्रिक केली आहे. राज्यसभेतील हॅट्ट्रिकबद्दल रामदास आठवले यांचे देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनतेसह सर्व वर्गातील जनतेने अभिनंदन केले आहे.


महाराष्ट्रातून राज्यसभेवर ७ खासदार बिनविरोध निवडून गेलेले आहेत. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड होऊन रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिसऱ्या टर्मची सुरुवात रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून केली आहे.


रामदास आठवले यांची एप्रिल २०१४ ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२६ पर्यंत त्यांच्या दुसऱ्या टर्मची मुदत होती. आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली आहे. दिनांक ६ एप्रिल २०२६ ते एप्रिल २०३२ पर्यत रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिसऱ्यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. ना.रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे.


आपल्या तिसऱ्या राज्यसभा सदस्यत्वाची रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर आंबेडकरी जनतेने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि