Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली. चोरी करून पळणाऱ्या आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट तलावात उडी घेतली आणि तब्बल पाच तास पाण्यात लपून बसल्याची घटना समोर आली आहे.



तलावात लपण्याचा अनोखा प्रयत्न


जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्यानंतर हरविंदर सिंग (वय 32) याने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्याचे लक्षात येताच त्याने जवळच्या तलावात उडी घेतली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने कमळाच्या पोकळ देठाचा वापर करून श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याखाली लपून राहिला.



पाच तास चालले शोधमोहीम


6 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर RPF ने स्थानिक पोलिस आणि डायव्हर्सच्या मदतीने शोधमोहीम सुरू ठेवली. आरोपी तब्बल पाच तास पाण्यात लपून बसला होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला शोधून शोधण्यात यश मिळवले.


पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि जुन्या नोंदींचा आधार घेत तपास केला. ICJS प्रणालीद्वारे तपास करताच तो उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील सराईत गुन्हेगार हरविंदर सिंग असल्याचे स्पष्ट झाले.



अनेक राज्यांत गुन्ह्यांची नोंद


या आरोपीविरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो प्रामुख्याने रेल्वेत विनातिकीट प्रवास करून महिला आणि वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करत असे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार सिम कार्ड बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे.


इगतपुरी, भोपाळ, इटारसी आणि विशाखापट्टणम येथील रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आधीच वॉरंट जारी केले होते. त्यामुळे तो दीर्घकाळापासून पोलिसांच्या रडारवर होता. अखेर जबलपूर RPF ने त्याला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने केलेला हा अनोखा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला असला, तरी अखेरीस पोलिसांच्या कारवाईसमोर त्याचा डाव फसला आणि सराईत गुन्हेगार जाळ्यात अडकला.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी