माध्यमांतराची गाथा...

कोणत्याही क्षेत्रातल्या कुणा व्यक्तीची जन्मशताब्दी असली की त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, त्यासंबंधी आठवणींना उजाळा दिला जातो. असेच एक उदाहरण आता मराठी रंगभूमीवर कायम झाले आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे माध्यमांतर...! प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांची यंदा जन्मशताब्दी आहे आणि हे औचित्य साधून त्यांच्या तीन कथांवर आधारित 'महोगाथा' हे नाटक मराठी रंगभूमीवर आले आहे. यानिमित्ताने, साहित्य ते नाट्यकृती असा हा माध्यमांतराचा प्रवास झालेला दिसून येत असून, या नाटकाच्या माध्यमातून संबंधित नाटकमंडळींनी महाश्वेतादेवी यांच्या लेखणीला सलाम केला आहे.


या नाटकाचे रंगभूमीवर प्रयोग होत आहेत; इतकेच त्याचे महत्त्व नाही, तर या नाटकाबद्दल वैचारिक चर्चा सध्या नाट्यसृष्टीत सुरू आहे. कारण नेहमीच्या चाकोरीबद्ध पठडीत न बसणारे हे नाटक आहे. मुळात महाश्वेतादेवी यांच्या कथा निवडून त्यावर नाट्यसंहिता लिहायची आणि ती आत्मविश्वासाने रंगभूमीवर सादर करायची; असे महत्त्वाचे कार्य या नाटकमंडळींनी केले आहे. बंगाली भाषेतल्या कथांचे माध्यमांतर, मराठी रंगभूमीवर या नाटकाच्या निमित्ताने झालेले दिसून येत आहे. साहजिकच, या नाटकाच्या माध्यमातून दोन भाषांचे आदानप्रदानही घडून आले आहे. कलेला भाषा नसते याचे उत्तम उदाहरण 'महोगाथा' नाटकाने कायम केले आहे.


प्रयोगशीलतेची कास धरलेल्या या नाटकात आघाडीचे कलावंत नसतानाही, आशयानुरूप हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर लक्ष वेधून घेत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, म्हणजेच १४ एप्रिल रोजी संध्याकाळी या नाटकाचा प्रयोग प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. सावित्री मेधातूल यांनी हे नाटक लिहिले असून, मंगेश सातपुते यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.


हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातूल हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून महाश्वेतादेवी यांच्या कार्याला मानवंदना देण्यास ते आता सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

Bollywood News : करीना कपूरचा ‘दायरा’ की कुणाल खेमूचा ‘व्हाइब’? दोन्ही सिनेमांना ‘A’ सर्टिफिकेट; १८ सप्टेंबरला कोण मारणार बाजी?

मुंबई : करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ आणि

CINTAA Controversy : कलाकारांमध्येच पेटला वाद! पूनम-पद्मिनी-कुनिकाचा CINTAA कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) कार्यालयात कलाकारांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

Hevaan Movie : अक्षय-सैफची ‘हैवान’ जोडी बॉक्स ऑफिसवर फेल? पहिल्याच दिवशी कमाईचा आकडा निराशाजनक

मुंबई : 'हनुमान अंश'चे बॉक्स ऑफिसवरील वर्चस्व कायम आहे. या चित्रपटाचा दबदबा असतानाच, अक्षय कुमार आणि सैफ अली खान

Sayani Gupta Hollywood : सयानी गुप्ताच्या ‘आर्या’ या अमेरिकन चित्रपटात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन झळकणार; हॉलीवूडमध्येही मराठीची चर्चा

मुंबई: अष्टपैलू अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरत असून, भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच

Mary Kom : अभिमान की अहंकार? सानिया-सायनाचा उल्लेख होताच मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासारखं कुणी...’; नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘बिग बॉस २०’मध्ये मेरी कोमच्या कारकिर्दीचा आणि तिच्या यशाचा उल्लेख होत असतानाच तिच्या एका वक्तव्याने

Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ

मुंबई : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' (Hero  Movie) चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर करताना