Hevaan Movie : अक्षय-सैफची ‘हैवान’ जोडी बॉक्स ऑफिसवर फेल? पहिल्याच दिवशी कमाईचा आकडा निराशाजनक

मुंबई : 'हनुमान अंश'चे बॉक्स ऑफिसवरील वर्चस्व कायम आहे. या चित्रपटाचा दबदबा असतानाच, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'हैवान' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला. सैफ-अक्षय जोडीला पुन्हा एकत्र आणणाऱ्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे ७,२२४ शोज असूनही 'हैवान'ने पहिल्या दिवशी केवळ ३ कोटी रुपयांची कमाई केली. (Hevaan Movie)



दुसरीकडे, 'हनुमान अंश'पहिल्याच दिवशी कमाई निराशाजनकच्या कमाईचा वेग कायम आहे. प्रदर्शनाच्या ३६ व्या दिवशीही या चित्रपटाने ५,७४३ शोजद्वारे अंदाजे १०.५० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचे एकूण देशांतर्गत संकलन १७३.६३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. लेखक-दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटात शोभिनव सत्या मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित असून बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम राखून आहे. (Hevaan Movie)



त्याचबरोबर, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांची भूमिका असलेला 'मिर्झापूर द मूव्ही' देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १४८.४५ कोटी रुपयांची कमाई केली. आठव्या दिवशी (दुसऱ्या शुक्रवारी) कमाईत थोडी घट होऊनही, चित्रपटाने अंदाजे ९ कोटी रुपयांचे संकलन केले. परिणामी, 'मिर्झापूर द मूव्ही'चे एकूण देशांतर्गत संकलन १५७.४५ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. (Hevaan Movie)

Comments
Add Comment

Bollywood News : करीना कपूरचा ‘दायरा’ की कुणाल खेमूचा ‘व्हाइब’? दोन्ही सिनेमांना ‘A’ सर्टिफिकेट; १८ सप्टेंबरला कोण मारणार बाजी?

मुंबई : करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ आणि

CINTAA Controversy : कलाकारांमध्येच पेटला वाद! पूनम-पद्मिनी-कुनिकाचा CINTAA कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) कार्यालयात कलाकारांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

Sayani Gupta Hollywood : सयानी गुप्ताच्या ‘आर्या’ या अमेरिकन चित्रपटात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन झळकणार; हॉलीवूडमध्येही मराठीची चर्चा

मुंबई: अष्टपैलू अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरत असून, भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच

Mary Kom : अभिमान की अहंकार? सानिया-सायनाचा उल्लेख होताच मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासारखं कुणी...’; नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘बिग बॉस २०’मध्ये मेरी कोमच्या कारकिर्दीचा आणि तिच्या यशाचा उल्लेख होत असतानाच तिच्या एका वक्तव्याने

Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ

मुंबई : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' (Hero  Movie) चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर करताना

Ameesha Patel : अमीषा पटेलला लाखोंचा फटका! आईच्या घरातून डायमंड ब्रेसलेट गायब; तपासात हाऊस हेल्पर अटकेत

मुंबई : ‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि सुपरहिट