Amaal Malik : गाण्याला श्रेय न दिल्याने संगीतकार अमाल मलिक संतापला; सलमान खानच्या टीमवर डागली तोफ

मुंबई : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' (Hero  Movie) चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर करताना गाण्याचे संगीतकार आणि गीतकाराचे नाव न दिल्याने प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिक याने 'सलमान खान फिल्म्स'वर (SKF) जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया टीमने गाण्याच्या निर्मात्यांचा असा अनादर केल्याबद्दल अमालने कमेंट सेक्शनमध्ये आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.



"गाण्याचे मूळ निर्माते विसरलात ?" – अमालचा थेट सवाल


'सलमान खान फिल्म्स'च्या अधिकृत अकाउंटवर कमेंट करत अमालने लिहिले, "जे कोणी हे पेज हाताळत आहेत, त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते! एका गाण्याच्या निर्मितीमागे संगीतकार आणि गीतकाराचे रक्त, घाम आणि अपार मेहनत असते. असे असताना मूळ निर्मात्यांना कोणतेही श्रेय न देता, त्यांचा उल्लेखही न करता गाण्याचा उत्सव साजरा करणे अजिबात शोभत नाही." टीमच्या या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत अमालने पुढे लिहिले, "किमान मूलभूत गोष्टी तरी शिकून घ्या, नाहीतर हे पेज बंद करा. माझी ही कमेंट डिलीट करू नका, जेणेकरून सलमान सर स्वतः ही कमेंट पाहू शकतील आणि तुमच्या या मोठ्या चुकीबद्दल त्यांना कळेल."



'मै हुं हिरो तेरा' गाण्याची निर्मिती


'हिरो' चित्रपटातील गाजलेल्या 'मै हुं हिरो तेरा' या गाण्याचे संगीत अमाल मलिकने दिले होते, तर याचे बोल प्रसिद्ध गीतकार कुमार यांनी लिहिले होते. या गाण्याचे मूळ व्हर्जन अमालचा भाऊ अरमान मलिक याने गायले होते, तर सलमान खानने स्वतःच्या आवाजात याचे दुसरे व्हर्जन गाऊन प्रदर्शित केले होते.



संगीतातून तात्पुरता ब्रेक आणि 'बिग बॉस'चा प्रवास


अमाल मलिकने बॉलीवूडमध्ये 'जय हो', 'रॉय', 'कपूर अँड सन्स', 'एम. एस. धोनी', 'बद्रिनाथ की दुल्हनिया' आणि 'कबीर सिंग' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले आहे. 'मै रहूं या ना रहूं' यांसारख्या त्याच्या स्वतंत्र गाण्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच अमालने आरोग्याच्या कारणास्तव आणि विश्रांतीसाठी पुढील वर्षापर्यंत बॉलिवूड संगीतातून तात्पुरता ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. प्रसिद्ध संगीतकार डबू मलिक यांचा मुलगा आणि अनु मलिक यांचा पुतण्या असलेला अमाल मलिक 'बिग बॉस' या लोकप्रिय रिॲलिटी शोचा अंतिम फेरीतील (फायनालिस्ट) स्पर्धकही राहिला आहे.

Comments
Add Comment

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनवरून वाद; स्काउटने लव्हला केलं नॉमिनेट, लव्ह गिल भावूक

बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक

Ramayana Movie : "रावण पूर्णपणे वाईट नव्हता..." 'रामायण' चित्रपटाबाबत साई पल्लवीचे मोठे वक्तव्य!

मुंबई : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू

Katrina Kaif praises Vicky Kaushal: ‘विकी आदर्श नवरा अन् उत्कृष्ट वडील!’ कतरिना कैफने पतीचे केले भरभरून कौतुक

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य हे खाजगी ठेवणे पसंत केले आहे. त्यांनी आपला मुलगा विहान

Ramayan Movie : भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण! नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण’ १०० हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित

भारताचा इतिहास आणि संस्कृती पोहोचणार जगभरात भारताची कालातीत महागाथा, सांस्कृतिक वारसा आणि सभ्यतेची मुळे

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर 'ती' चूक ! स्वतःच मागितली चाहत्यांची माफी, नेमकं काय घडलं ?

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या

Vishnubala : सयाजी शिंदेंचा मुलगा सिद्धार्थ करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून बापलेकाची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता नव्या कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांची पुढची पिढी