CINTAA Controversy : कलाकारांमध्येच पेटला वाद! पूनम-पद्मिनी-कुनिकाचा CINTAA कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) कार्यालयात कलाकारांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओमध्ये पूनम ढिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंग, कुनिका सदानंद यांच्यासह काही कलाकारांमध्ये वाद आणि बाचाबाची होताना दिसत आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत संबंधित कलाकारांना समज दिली. (CINTAA Controversy)


दरम्यान, कुनिका सदानंदने अलीकडेच CINTAAची अधिकृत कागदपत्रे आणि फाईल्स पूनम ढिल्लनच्या गाडीतून नेण्यात आल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये काही सदस्य पद्मिनी कोल्हापुरेकडे याबाबत जाब विचारताना दिसत आहेत. कागदपत्रे नेण्यात आल्याची कबुली त्या देत आहेत का, असा सवाल सदस्यांकडून करण्यात येतो. त्यावर पद्मिनी संबंधित समिती बरखास्त झाल्याचे जाहीर करणारे पत्र दाखवण्यास सांगताना दिसते. (CINTAA Controversy)






या संपूर्ण वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संबंधित कलाकारांना समज देताना, पोलीस आपण या प्रकरणात तटस्थ असून सर्व पक्षांसाठी समान भूमिका असल्याचे स्पष्ट करताना दिसतात. मात्र, याचदरम्यान पद्मिनी कोल्हापुरेने तिचा ‘डेटा चोरीला गेला’ असल्याचा दावा केल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येते. (CINTAA Controversy)


दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पूनम ढिल्लन आपल्या गाडीची झडती का घेतली जात आहे, असा सवाल करताना दिसते. हा व्हिडिओ कथितरित्या कुनिका सदानंदने रेकॉर्ड केला असून, त्यावरून पूनम तिच्यावरही नाराजी व्यक्त करताना दिसते. दोघींमध्ये वाद सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी पोलिसांनी, “असं बोलल्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय. आम्ही झोपडपट्टीतल्या लोकांशीसुद्धा असं बोलत नाही,” असं म्हटलं. पुढे त्यांनी, “किमान तुझ्या प्रतिष्ठेची तरी काळजी घे, लोक बघत आहेत. तू तुझ्याच आरोपांमध्ये अडकली आहेस आणि आमचं ऐकत नाहीयेस. दुसरी कोणी असती तर आम्ही थोबाडीतच मारली असती. आम्ही तुला आदर देतोय, पण त्यालाही एक मर्यादा आहे,” असंही सुनावलं. (CINTAA Controversy)



दरम्यान, उपासना सिंगने पोलिसांना कथितरित्या यापूर्वी पाठवलेली कागदपत्रे परत मागवण्याची विनंती केली. त्यावर पोलिसांपैकी एकाने, “हे माझं काम नाही. जर त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केली असेल, तर कामगार आयोग त्यांना ती सादर करण्यास सांगेल,” असं उत्तर दिलं. यावेळी सदस्यांमध्ये आणि पोलिसांमध्येही वाद सुरू होता. निवडणूक जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रवेश दिला जात नसल्याचे कुनिका वारंवार सांगताना दिसत आहे.



CINTAA बाबतच्या एकंदर समस्या


ऑगस्टमध्ये, २१ सदस्यीय निर्वाचित समितीच्या ८ निर्वाचित प्रतिनिधींसह ११ सदस्यांनी राजीनामा दिल्यावर CINTAA मधील अंतर्गत वाद समोर आले. एका संयुक्त पत्रात, सदस्यांनी संघटना सामूहिक निर्णयप्रक्रिया, सल्लामसलत आणि घटनात्मक प्रशासनापासून वारंवार दूर जात असल्याच्या कथित घटनांची यादी दिली. जेव्हा उपासना यांनी सांगितले की, निर्वाचित समितीच्या ५०% सदस्यांनी राजीनामा दिल्याने समिती बरखास्त करण्यात आली आहे, तेव्हा पूनम यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. (CINTAA Controversy)



या महिन्याच्या सुरुवातीला, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने ( FWICE ) नवीन निवडणुका जाहीर केल्यानंतर, पूनम आणि पद्मिनी यांनी स्थगिती आदेशासाठी न्यायालयात धाव घेतली. पण त्यांची याचिका फेटाळण्यात आली. १२ सप्टेंबर रोजी नियोजित निवडणुकांच्या केवळ एक दिवस आधी, शासकीय कागदपत्रे चोरून बाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (CINTAA Controversy)


Comments
Add Comment

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनवरून वाद; स्काउटने लव्हला केलं नॉमिनेट, लव्ह गिल भावूक

बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक

Ramayana Movie : "रावण पूर्णपणे वाईट नव्हता..." 'रामायण' चित्रपटाबाबत साई पल्लवीचे मोठे वक्तव्य!

मुंबई : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू

Katrina Kaif praises Vicky Kaushal: ‘विकी आदर्श नवरा अन् उत्कृष्ट वडील!’ कतरिना कैफने पतीचे केले भरभरून कौतुक

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नेहमीच आपले वैयक्तिक आयुष्य हे खाजगी ठेवणे पसंत केले आहे. त्यांनी आपला मुलगा विहान

Ramayan Movie : भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण! नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण’ १०० हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित

भारताचा इतिहास आणि संस्कृती पोहोचणार जगभरात भारताची कालातीत महागाथा, सांस्कृतिक वारसा आणि सभ्यतेची मुळे

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर 'ती' चूक ! स्वतःच मागितली चाहत्यांची माफी, नेमकं काय घडलं ?

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या

Vishnubala : सयाजी शिंदेंचा मुलगा सिद्धार्थ करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून बापलेकाची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता नव्या कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांची पुढची पिढी