NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट


मुंबई : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. किनारपट्टी लाभलेल्या जिल्ह्यांमधील मच्छिमारांना मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मच्छिमारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.



राज्यातील अनेक मासळी उतरवण्याच्या केंद्रांवर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची बाब सातत्याने समोर येत होती. ही उणीव भरून काढण्यासाठी सरकारने नाबार्डच्या कर्ज योजनेतून बंदरे आणि लहान धक्के (जेट्टी) उभारण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ९५ टक्के वाटा नाबार्ड उचलणार असून, केवळ ५ टक्के वाटा राज्य सरकारला खर्च करावा लागणार आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या निधीतून काही पूर्ण झालेली कामे आणि सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यात प्रामुख्याने ठाणे जिल्हा दिवाळे गाव, पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू आणि पाचू बंदर. रायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी आणि नांदगाव. रत्नागिरीमधील वेलदूर आणि बोऱ्या, तर सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग आणि मुंबईतील चिंबई येथील कामांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा