Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ सख्ख्या भाऊ-बहि‍णीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (१०), असं मृत्यू झालेल्या बहीण-भावाचं नाव आहे.


मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे वडिल संतोषकुमार अंकलगी यांचं काही वर्षापूर्वी अपघातात निधन झालं. त्यानंतर आई उषा संतोषकुमार अंकलगी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होते.


नेमकं काय घडलं ?


रविवारी म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. मुलगा श्रवण हा शाळेला सुट्टी असल्यानं विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी दीडच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी शेततळ्यात पोहण्यासाठी गेले यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावं, यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र, दुर्दैवानं झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण, त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते.


नात,नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्यानं आजी महादेवी कोळी शेततळ्याकडे गेल्या असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढलं.


दोन्ही चिमुकले बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं . याचा अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत.


या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, काळाने घाला घातल्यानं दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. या घटनेमुळे औज मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा