PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रथमच संवाद झाला आहे.


माहितीनुसार, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या उच्चस्तरीय बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) या चर्चेची माहिती देताना म्हणाले की, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला असे त्यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांमधील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा झाली असून होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुला ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.



भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत-अमेरिका संबंध मजबूत पायावर उभे आहेत. ट्रम्प यांनी मोदींना, “आम्हाला तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे,” असे म्हंटल्याचे सर्जियो गोर यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर ही पहिलीच चर्चा आहे. दोन्ही नेत्यांनी होर्मुज जलडमरूमध्यावरील परिस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले, जो सध्या मध्यपूर्वेतील तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, होर्मुज परिसरात इराणी नौदलाच्या जहाजांवर कारवाई करण्यात आली असून तेथील बारूदी सापळे हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि